सांगली:- सांगली व मिरज शासकीय रुग्णालयात रुग्ण हक्क सनद फलकाचे अनावरण.रुग्णांचे हक्क हेच खरे मानव अधिकार आहेत. रुग्णांचा सन्मान व सेवा ही डॉक्टर परिवाराची प्राथमिक जबाबदारी असून, विविध जाणीव-जागृती उपक्रमात लोकसहभाग वाढणे अत्यावश्यक आहे. रुग्ण हक्क सनदेप्रमाणे अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येईल, असे मनोगत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी व्यक्त केले.
मानव अधिकार दिनानिमित्त, सांगली व मिरज येथील शासकीय रुग्णालयांच्या परिसरात राज्यातील प्रथम रुग्ण हक्क सनद प्रबोधन फलक लावण्यात आले, याचे अनावरण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव होते. प्रमुख पाहुणे म्हणून खाडे शैक्षणिक संकुलनाच्या स्वाती खाडे आणि शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम उपस्थित होते. यावेळी रुग्णालयात कर्तव्यनिष्ठेने कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले.तसेच संविधान दिनी जाणीव-जागृतीचे उपक्रम राबवल्याबद्दल स्वाती खाडे,बेघर महिलांच्या पुनर्वसन व पुनर्विवाहासाठी कार्य करणाऱ्या सुरेखा शेख यांचा विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या निमित्ताने एचआयव्ही बाधित पालकांच्या मुलींनी साकारलेल्या रांगोळी प्रदर्शनाला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन त्यांचे कौतुक केले.जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी महत्त्वाच्या सूचना दिल्या. सार्वजनिक आरोग्य सेवा गरीब रुग्णांसाठी टिकून राहिली पाहिजे. रुग्ण हक्क सनद नुसार धर्मादाय रुग्णालय, खाजगी रुग्णालय यांनी उपचारांचे दरपत्रक स्पष्टपणे लावणे.तक्रार निवारण प्राधिकरण व तक्रार कक्ष सुरू करणे.टोल-फ्री हेल्पलाइन कार्यान्वित करणे.रुग्णालय परिसरात जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णांच्या समस्या समजून घेत तातडीने दिलेल्या सूचनांमुळे रुग्ण व नातेवाईकांमध्ये समाधान व्यक्त होत होते.प्रास्ताविक आरोग्य हक्क समिती जन आरोग्य अभियानाचे शाहीन शेख, स्वागत राजेश साळुंखे, सूत्रसंचालन हनीफ डफेदार,आभार रमजान खलिफा,संयोजन प्रमोद माळी,कार्यक्रमाला ह्यूमन राईट जस्टीस असोसिएशनचे नसीर सय्यद, अण्णा कनवडकर, नीता मुरगुडे, युसुफ शेख, अहमद शेख, रमेश भोसले, ॲड. संजय पाटील, भारत होनमाने, अविनाश काकडे, चंद्रकांत माळी, योगेश रोकडे, बाळासाहेब रास्ते, योगेश पांडव, अफजल मोमीन आदी मान्यवर उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.