Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

श्री. रावसाहेब पाटील यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान

श्री. रावसाहेब पाटील यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान


सांगली येथील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक तसेच औषध व्यापार क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणारे संस्थावर्धक नेतृत्व श्री. रावसाहेब पाटील यांना मानद डॉक्टरेट (Hon. Doctorate) पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. दिल्ली येथील नीती आयोगाच्या मान्यताप्राप्त सॉक्रेटिस सामाजिक संशोधन विद्यापीठाच्या वतीने, श्री. रावसाहेब पाटील यांच्या आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

ग्रामीण भागातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जीवनप्रवास सुरू करून स्वतःचे स्वतंत्र व प्रेरणादायी विश्व उभारणाऱ्या श्री. रावसाहेब पाटील यांच्या कार्याचा गौरव या मानद डॉक्टरेट पदवीद्वारे करण्यात आला आहे. हा पदवी प्रदान सोहळा दिलासा फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. सदर मानद डॉक्टरेट पदवी डॉ. विजय पंडित (अध्यक्ष, अग्रवाल कॉलेज) व पद्मिनी कृष्णा (सचिव, दिलासा फाउंडेशन) यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आली.हा सोहळा कल्याण (मुंबई) येथे संपन्न झाला. यावेळी श्रीचंद केसवानी, डॉ. मुकुंद बोधनकर (वरिष्ठ शास्त्रज्ञ, ए.पी.टी. रिसर्च फाउंडेशन, पुणे), डॉ. शशी धरण (कार्पोरेट प्रशिक्षक), श्री. योगेश शर्मा (शास्त्रज्ञ) तसेच डॉ. दीपक खांडेकर (अभिनेते व लेखक) ,श्री कुमार नायर हे मान्यवर प्रमुख उपस्थित होते. 

हा सन्मान श्री. रावसाहेब पाटील यांनी आपल्या पत्नी सौ. कांचन पाटील व चिरंजीव सागर पाटील यांच्या उपस्थितीत स्वीकारला. याप्रसंगी विद्यापीठ व दिलासा फाउंडेशनच्या वतीने श्री. पाटील यांनी विविध क्षेत्रांत केलेल्या कार्याची माहिती देत त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. यापूर्वी मिळालेल्या विविध पुरस्कारांबरोबरच या मानद डॉक्टरेट पदवीमुळे समाजासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची नवी ऊर्जा व प्रेरणा मिळाल्याचे मनोगत श्री. रावसाहेब पाटील यांनी व्यक्त केले. डावीकडून  दीपक  खांडेकर  कांचन  पाटील  सागर  पाटील  पुरस्कार  हस्ते  विजय  पंडित  पद्मिनी  कृष्णा शशी  धरण



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.