सांगली : महापालिका निवडणुकीत लोकांच्या शिफारसीनुसार उमेदवार दिला जाईल. तसेच उच्च शिक्षितांना उमेदवारीसाठी प्राधान्य देणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.
शहरातील प्रमुख पदाधिकार्यांची बैठक आमदार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत आमदार पाटील बोलत होते. या वेळी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, पक्षाचे निरीक्षक शेखर माने, राहूल पवार उपस्थित होते. यावेळी आमदार पाटील म्हणाले, महापालिका निवडणुक पक्ष ताकदीने लढविणार असून तरुणांना आणि स्थानिक जनतेच्या शिफारसीनुसार विकासाला पुढे नेण्यासाठी कटिबद्ध असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी दिली जाईल.
महापालिकेचे उमेदवार निवडताना प्रत्येक प्रभागात थेट लोकांशी संवाद साधला जाईल. प्रभागात जाऊन लोकांच्या शिफारसीनुसार आणि त्या प्रभागाच्या विकासासाठी योगदान देणार्या कार्यकर्त्याला संधी दिली जाईल. त्याचबरोबर तरुण उमेदवारांना जसे डॉयटर, वकील, इंजिनियर आणि समाजसेवक-यांना विशेष प्राधान्य दिले जाईल, जेणेकरून शहराच्या प्रश्नांना नवीन दृष्टीकोन आणि युवाशक्ती मिळेल.पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी दि. ७ ते १० डिसेंबर या मुदतीत वसंत मार्केट यार्ड, सांगली येथील पक्ष कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज भरावेत. ११ तारखे पासून पक्षाचे प्रमुख पदाधिकारी प्रतेक्य प्रभागात जाऊन, जनतेच्या अभिप्रायावरून उमेदवार ठरवतील. शहराच्या विकासावर लक्ष देत पाणीपुरवठा सुधारणा, खड्डेमुक्त रस्ते, औ्द्योगिक वाढ आणि रोजगाराच्या संधी या सर्व बाबींवर पक्ष भर देत आहे. या बैठकीस माजी नगरसेवक धनपाल खोत, चंद्रकांत हुलवान, विजय घाडगे, अभिजीत भोसले, शेडजी मोहिते, राज्जाक नाईक, पवित्रा केरीपाळे, संगीता हारगे, मनगू आबा सरगर, अपर्णा कदम, अझम काजी, शिवाजी दुर्वे, मुस्ताक रंगरेज, सचिन जगदाळे, तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.