Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नितीश कुमार मोठा धमाका करण्याच्या तयारीत; भाजपला शह देण्यासाठी पडद्याआडून हालचाली

नितीश कुमार मोठा धमाका करण्याच्या तयारीत; भाजपला शह देण्यासाठी पडद्याआडून हालचाली


पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवल्यानंतर जेडीयूच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप ८९ जागा जिंकत राज्यात सर्वात मोठी पक्ष ठरला. तर जेडीयूनं ८५ जागा जिंकत दुसरा क्रमांक पटकावला. २०२० मध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रीय जनता दलाची जोरदार पिछेहाट झाली. राजद थेट तिसऱ्या क्रमांकावर घसरला. पण जेडीयूनं आता क्रमांक एकचा पक्ष होण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.

बिहार विधानसभेत एमआयएमचे ५, बहुजन समाज पक्ष आणि आयआयपीचा प्रत्येकी १ आमदार आहे. या आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न जेडीयूनं सुरु केले आहेत. त्या प्रयत्नांना यश आल्यास जेडीयू भाजपला मागे टाकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरु शकतो. विधानसभेतील संख्याबळाचा आकडा लवकरच बदलणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
आय. पी. गुप्ता आयआयपी नावानं स्वत:ची संघटना स्थापना करुन महागठबंधनसह मैदानात उतरले. त्यांना यश मिळालं, पण महागठबंधनची अवस्था बिकट झाली. आता गुप्ता यांचा सूर बदलला आहे. ततवा-तांती जातीला एससीचा दर्जा देणाऱ्या पक्षासोबत जाऊ, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. सध्याच्या घडीला भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीए सरकार आहे. त्यामुळे हा विषय एनडीएकडूनच मार्गी लावला जाऊ शकतो. पण हा प्रश्न थोडा किचकट आहे. नितीश कुमार यांनी या संदर्भात आश्वासन दिल्यास गुप्ता जेडीयूच्या दिशेनं जाऊ शकतात. ततवा-तांती समाजाच्या आरक्षणावरुन नितीश आणि आय पी गुप्ता यांचे विचार सारखेच आहेत. 

मायावती यांच्या बसपचे आमदारही फुटू शकतात. त्यांच्या आमदारांनी आधीही पक्ष बदलले आहेत. गेल्या निवडणुकीत जमा खान बसपच्या तिकिटावर जिंकले. पण नंतर ते जेडीयूमध्ये गेले. नितीश यांनी त्यांना मंत्रिदेखील केलं. तेव्हापासून ते नितीश यांचे विश्वासू मानले जातात. यंदा ते जेडीयूकडून लढले आणि पुन्हा मंत्री झाले. यंदाही बसपचा एक आमदार जिंकला आहे. त्या आमदाराला फोन येत असून प्रलोभनं दाखवली जात असल्याचा दावा गेल्या काही दिवसांपूर्वी बसपचे प्रदेशाध्यक्ष अनिल कुमार यांनी केला होता.

असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमबहुल सीमांचलमध्ये राजकीय जमीन तयार केली आहे. २०२० आणि २०२५ मध्ये त्यांनी प्रत्येकी ५ जागा जिंकल्या. गेल्या वेळी एमआयएमचे ४ आमदार तेजस्वी यादव यांच्या जेडीयूमध्ये गेले होते. यंदाही ओवेसी यांचे आमदार पक्षाशी एकनिष्ठ राहतील याची शक्यता कमीच आहे. हे आमदार मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं कौतुक करु लागले आहेत. त्यामुळे ते जेडीयूमध्ये जाऊ शकतात.
एमआयएम, बसप आणि आयआयपीचे एकूण ८ आमदार आहेत. यातील ५ आमदार गळाला लागल्यास जेडीयूच्या आमदारांचा आकडा ९० च्या घरात जाईल. अशा स्थितीत भाजपला मागे टाकून जेडीयू सर्वात मोठा होईल. यातील किती आमदार नितीश यांच्या गळाला लागणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण जेडीयूनं त्यांच्या कोट्यातील ६ मंत्रीपदं रिक्त ठेवली आहेत. त्यामुळे मंत्रि‍पदासाठी काही आमदार पक्षांतर करु शकतात.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.