महाराष्ट्र हादरला! 'प्रॅक्टिकलचे मार्क वाढवून देतो!' एकटीला भेटायला बोलवलं अन्..., शिक्षकाचं विद्यार्थिनीसोबत घृणास्पद कृत्य
बुलढाणा: प्रॅक्टिकलचे गुण वाढवून देण्याच्या बहाण्याने १६ वर्षीय विद्यार्थिनीस घरी बोलावून शिक्षकाने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकाराचा पीडितेच्या मैत्रिणीला व्हिडीओ कॉल करून स्क्रीन रेकॉर्डींग करायला लावले. ही धक्कादायक घटना मलकापूर शहरात ऑक्टोबर महिन्यात घडली. पुन्हा लगट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकास विरोध केल्यानंतर त्या मुलीच्या मैत्रिणीने व्हिडीओ व्हायरल केल्याने ही घटना समोर आली. या प्रकरणी मलकापूर पोलिसांनी आरोपी शिक्षक आणि पीडित मुलीच्या मैत्रिणीविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.
नेमकं काय घडलं?
मुकेश परमसिंग रबडे (वय ४०) असे आरोपी शिक्षकाचे नाव असून, तो मोताळा तालुक्यातील तरोडा येथील रहिवासी आहे. तर शिक्षकाने केलेल्या गुन्ह्यात सहभागी असलेली १६ वर्षीय आरोपी मुलगी नांदुरा तालुक्यातील रहिवासी आहे. पीडित मुलगी ही शिक्षकाला ओळखत होती. शिक्षक रबडे याने विद्यार्थिनीला कॉल करून 'माझ्याकडे पॉलीचे बुक आहे, नोट्स आहे ते मी तुला देतो व तुझे प्रॅक्टीकलचे गुण वाढवून देण्यास सांगतो' असे म्हणत २८ ऑक्टोबरला मलकापूर तहसील चौकात बोलावून घेतले. नंतर तिला एका रूमवर नेले. आरोपी शिक्षकाने पीडित मुलीच्या मैत्रिणीच्या मोबाइलवर व्हिडीओ कॉल केला. तिला व्हिडीओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग करण्यास सांगितले आणि मुलीने त्याच्या म्हणण्याप्रमाणे शिक्षक करीत असलेल्या अत्याचाराचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले. विरोध केला असता आरोपीने पीडितेस मारहाण केली.
मैत्रिणीने केला व्हिडीओ व्हायरला
दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता चौकात सोडून दिले. या प्रकाराबाबत वाच्यता केल्यास तुला, वडिलांना आणि भावाला जीवे मारून टाकेन तसेच तुझा रात्रीचा व्हिडीओ कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याच्या धमक्या दिल्या. या प्रकारानंतर अधूनमधून आरोपीने तिला फोन कॉलही केले. मुलीने त्याचे कॉल न घेतल्याने आठ दिवसांपूर्वी आरोपी मैत्रिणीने व्हिडीओ व्हायरल केला. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.