Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आता रेशनवर पुन्हा मिळणार साखर; राज्यातील 'या' रेशन कार्डधारकांना दीड वर्षानंतर साखरेचा लाभ

आता रेशनवर पुन्हा मिळणार साखर; राज्यातील 'या' रेशन कार्डधारकांना दीड वर्षानंतर साखरेचा लाभ


अंत्योदय कार्डधारकांना दिलासादायक बातमी असून दीड वर्षानंतर साखरेचा गोडवा मिळणार आहे. एका अंत्योदय कार्डला रेशन दुकानातून प्रतिमहा एक किलो साखरेचे वितरण केले जाणार आहे. यासाठी पुरवठा विभागाकडे पाच हजार क्विंटल साखर उपलब्ध झाली आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाला नोव्हेंबर, डिसेंबर २०२५ व जानेवारी २०२६ या तीन महिन्यांची साखर उपलब्ध झाली आहे.

बहुतांश सामान्य कुटुंबांत सण उत्सवातच गोड पदार्थ बनवले जातात. यामुळे अंत्योदय कार्डधारकांना प्रतिकार्डाला एक किलो याप्रमाणे साखर दिली किलो जाते. साखरेसाठी बाजारात ४४ एक रुपये मोजावे लागतात. मात्र, रेशन दुकानातून २० रुपये प्रतिकिलोने साखर दिली जाते.

मात्र, दीड वर्षापासून रेशन दुकानात साखर मिळत नव्हती. सध्या जिल्हा पुरवठा विभागाला एक महिन्यांचे नियतन प्राप्त झाले असून, वाटप सुरू होत आहे. शासनस्तरावर साखरेचे टेंडर होत नसल्याने रेशन दुकानातून पुरवठा बंद झाला होता. याचा फटका ८७ हजार ०६४ अंत्योदय कार्डधारकांना बसला होता.

लाभार्थीना साखर उपलब्ध करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे नियतन पाठवले होते. यापैकी या महिन्यांसाठी पाच हजार क्विंटल साखरेचे नियतन मंजूर झाले असून, जिल्हा पुरवठा विभागाच्या गोदामात साखर उपलब्ध झाली आहे. आगामी काही दिवसांत रेशन दुकानातून साखरेचे वाट सुरू होणार आहे. यामुळे यंदा सामान्य कुटुंबातील नागरिकांना नववर्षाआधीच गोडवा मिळाला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.