मुंबई: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा स्फोट केला आहे. जरांगे पाटील यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर त्यांच्या जीवे मारण्याचा कट रचल्याचा अत्यंत गंभीर दावा केला आहे. या आरोपाची सत्यता सिद्ध करण्यासाठी आपण स्वत:ची नार्को टेस्ट करून घेण्यास तयार आहोत, असेही त्यांनी ठामपणे जाहीर केले आहे. जरांगे पाटील यांनी सरकारवर टीका करताना थेट भाजपवर बोट ठेवले. “काँग्रेसची बलाढ्य सत्ता गेली, भाजपचीसुद्धा सत्ता जाऊ शकते,” असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला.
वाल्मिकी कराड या व्यक्तीला तुरुंगातून सोडण्याचा घाट फडणवीस सरकारने घातल्याचा आणखी एक गंभीर आरोप त्यांनी केला तसेच घातपाताच्या कटासंबंधी अत्यंत महत्त्वाचे खुलासे करताना जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना लक्ष्य केले आहे. अटक केलेल्याआरोपींनी कबूल केल्यानंतरही धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटलांना मारण्यासाठी 2.5 कोटी रुपये दिले होते. जरांगे पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी धनंजय मुंडे यांना चौकशीसाठी बोलावण्याची मागणी केली आहे. त्यांनी इशारा देत म्हटले आहे की, जर मुंडे यांची चौकशी केली गेली नाही, तर याचे गंभीर परिणाम शासनाला भोगावे लागतील. जरांगे पाटलांचे म्हणणे आहे कि, दोन्ही उपमुख्यमंत्री मुंडेंना पाठिशी घालत आहेत आणि त्यांना ‘क्लीन चिट’ दिली जात आहे. जरांगे पाटलांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली की, हे दोन्ही नेते चांगले असले तरी, ते सध्या अयोग्य व्यक्तींना संरक्षण देत आहेत. त्यांच्या ‘भाजपचीसुद्धा सत्ता जाऊ शकते’ या वक्तव्यामुळे राज्यात मोठ्या घडामोडींची शक्यता व्यक्त केली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.