Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बेपत्ता निखिल रणदिवे प्रकरणाला वेगळं वळण! दौंड चे डीवायएसपी बापुराव दडस कडून तपास काढून घ्या! अक्षदा रणदिवे यांनी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी!

बेपत्ता निखिल रणदिवे प्रकरणाला वेगळं वळण! दौंड चे डीवायएसपी बापुराव दडस कडून तपास काढून घ्या! अक्षदा रणदिवे यांनी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी!


दौडं : बेपत्ता पोलीस नाईक निखील कैलास रणदिवे यांचा ४० तास उलटूनही अद्याप थांगपत्ता लागला नाही. रणदिवे यांच्या सुसाईड नोट आणि मोबाईलवर स्वतःच्या फोटोवर भावपूर्ण श्रद्धांजलीची फोटोची पोस्ट केल्यामुळे पुणे जिल्ह्यातील पोलीस दलात मोठी खळबळ उडाली. मागील दोन दिवसापासून ते देतात असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. 

शनिवारी (दि ६) निखिल रणदिवे यांची पत्नी अक्षदा हिने दोन मुले आणि नातेवाइकांसह यवत पोलीस ठाणे गाठले. तिथे उपस्थित असलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांना जाब विचारत चांगले धारेवर धरले. मात्र दडस यांनी त्याच्या पत्नीला आणि नातेवाईकांना उलटसुलट प्रश्न विचारत त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याचा प्रकार घडला. दडस सरळ सरळ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांना एक प्रकारे वाचवत असल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.


यासंदर्भात बेपत्ता पोलीस नाईक निखिल रणदिवे यांच्या पत्नी अक्षदा यांनी रविवारी ( दि ७) पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्याकडे जे या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले होते, तो तपास दडस यांच्याकडून काढून घेऊन तो पुणे पोलीस दलातील दुसऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे द्यावा अशी लेखी मागणी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. 

दरम्यान, पोलीस नाईक निखिल रणदिवे हे ५ डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या जाचाला कंटाळून बेपत्ता झाले आहेत. मागील एक वर्षापासून वारंवार मानसिक त्रास देत असुन आत्महत्येस प्रवृत्त केले आहे. माझे पती बेपत्ता असून ४० तास होऊन अद्यापपर्यंत देखील मिळून आले नाहीत. दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस हे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांना या प्रकरणी वाचवत आहेत, त्यामुळे माझे पती यांच्या तक्रार अर्जाची सखोल चौकशी व तपास वरीष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्फत करण्यात यावा व माझे पती यांचा शोध लावून न्याय मिळावा तसेच सदर प्रकरणी दोषी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या वर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी निखिल यांची पत्नी अक्षदा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

२० जुलै २०२५ रोजी पोलीस नाईक निखिल रणदिवे यांच्यासह चार पोलीस कर्मचाऱ्यांना केले होते कार्यमुक्त!

पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी २० जुलै २०२५ रोजी यवत पोलीस ठाण्यात काम करणारे पोलीस कर्मचारी सुनील बगाडे, रवींद्र गोसावी, अजित इंगोले, प्रकाश झेंडे, आणि बेपत्ता निखिल कैलास रणदिवे यांना पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाकडील सर्वसाधारण बदल्या २०२५ च्या आदेशानुसार बदल्या झाल्या असून त्या सर्व अंमलदाराना आज रोजी कार्यालयीन वेळेत बदली ठिकाणी कार्यमुक्त केलेले आहे. असे पत्र पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांना दिले होते.
हा सर्व प्रकार डीवायएसपी दडस यांच्याकडे असताना ही त्यांच्या तपासाबाबत आणि कामाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दडस यांची भूमिका संशयास्पद आणि शंका निर्माण करणारी आहे. जर २० जुलै २०२५ रोजीच बेपत्ता निखिल रणदिवे यांना यवत पोलीस स्टेशन मधून बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त केले होते, तर त्यांना देशमुख यांनी यवत पोलीस ठाण्यात का ठेवले होते ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्याकडून तपास योग्य पद्धतीने केला जात नाही. ॲट्रॉसिटी तसेच अनेक गंभीर गुन्ह्यात त्यांनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीची माहिती आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन संभ्रम निर्माण केला जात आहे. मध्यंतरी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर यवत पोलीस ठाणे अंतर्गत सुरू असलेल्या अवैध व्यवसाय बाबत देशमुख यांचे कारनामे सोशल मीडियावर वायरल झाले होते. देशमुख हे कोणत्या अवैध व्यवसाय वाल्यांकडून किती हप्ते घेतात ? याची यादीच दिली होती.

यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कोल्हापूर विभागाचे पोलीस महासंचालक सुनील फुलारी आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे चौकशी करण्यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. त्याचा तपास डीवायएसपी दडस यांच्याकडे होता. मात्र दडस यांनी या प्रकरणात देशमुख यांना क्लीन चिट दिली. हे प्रकरण दडस यांनी देशमुख यांच्याशी संगनमत करून दडपले असल्याची चर्चा पोलीस खात्यात तर आहेच, पण यवत पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या गावांमध्ये आहे.
पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या संदर्भात डीवायएसपी यांच्याकडे तक्रार केल्यास ते त्यांची का पाठराखण करतात? या दोघांच्यात संगनमत नाही ना ? असा प्रश्न निर्माण होत असून दडस यांची भूमिका संशयास्पद आहे. ते एका मोठ्या राजकीय नेत्याच्या मर्जीप्रमाणे काम करत असल्याची चर्चा आता तालुक्यात सुरू आहे. ॲट्रॉसिटी प्रकरणात ते योग्य पद्धतीने तपास करत नसून त्यांच्या कार्यकाळातील सर्व ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील तपासासंदर्भात राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग, सामाजिक न्याय विभाग तसेच राज्याच्या गृह विभागाकडून सखोल चौकशी करून दडस यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी आता दलित संघटना करीत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.