राज्य सरकारने गुरुवारी तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिव पदावरून बदली झाल्यानंतर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अविनाश ढाकणे यांची नेमणूक मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली आहे.
ढाकणे यांच्यामुळे अमित सैनी यांना नव्या नियुक्तीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. राजेश अग्रवाल यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्याने रिक्त झालेल्या सामान्य प्रशासन विभागाच्या (प्रशासकीय नाविन्यता, उत्कृष्टता आणि सुशासन) प्रधान सचिवपदी अतुल पाटणे यांची नियुक्ती झाली आहे. पाटणे यांच्यासाठी हे पद अवनत करण्यात आले आहे. तर माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक कान्हुराज बगाटे यांची बदली मंत्रालयात नियोजन विभागाच्या सहसचिवपदी करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.