भारतीय महिला स्टार क्रिकेटर स्मृती मांनधना संगीत दिग्दर्शक पलाशसोबतचं लग्न पुढे ढकलण्यात आल्याने चर्चेत आहे. 23 नोव्हेंबरला होणारं लग्न स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने पुढे ढकलण्यात आलं आहे. लग्नाच्या दिवशीच तिचे वडील श्रीनिवास मांनधना यांची प्रकृती खालावली आणि त्यांनी सांगलीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यामुळे लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलं. दरम्यान दुसऱ्या दिवशी पलाशची तब्येत बिघडली आणि त्यालाही रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं. मात्र अद्याप दोन्ही कुटुंबाकडून लग्नाची नवी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. यादम्यान आतापर्यंत मौन बाळगलेल्या स्मृतीने इंस्टाग्रामवर पहिलीच पोस्ट शेअर केली आहे.
लग्नाच्या चर्चांदरम्यान स्मृतीने शुक्रवारी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटला एक पोस्ट शेअर केली. एका आघाडीच्या टूथपेस्ट ब्रँडसोबतची ही पेड पार्टनरशिप होती. तथापि, नेटकऱ्यांचं लक्ष तिच्या बोटात अंगठी नाही याने वेधून घेतलं. आता ही जाहिरात लग्नापूर्वी शूट करण्यात आली होती की नाही हे माहित नाही. तरीही, या जाहिरातीची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे
काही सोशल मीडिया युजर्सनी ही जाहिरात साखरपुड्याच्या आधी शूट करण्यात आली होती असा दावा केला आहे. दरम्यान, स्मृतीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून लग्नाशी संबंधित सर्व पोस्ट काढून टाकल्या आहेत, ज्यामुळे वेगवेगळे अंदाज व्यक्त होत आहेत. दोन्ही कुटुंबातील वेगवेगळ्या सदस्यांनी स्पष्ट केले आहे की हे लग्न केवळ प्रकृतीसंदर्भातील आपत्कालीन परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आले आहे. तथापि, पलाशची आई अमिता यांना आशा आहे की लग्न लवकरच होईल. हिंदुस्तान टाईम्सशी झालेल्या गप्पांमध्ये अमिता यांनी कबूल केले की स्मृती आणि पलाश दोघेही लग्नाच्या दिवशी घडलेल्या घटनेमुळे दुःखी आहेत. त्यांनी तर स्मृतीचं स्वागत करण्यासाठी खास योजनाही आखली होती.अनपेक्षित परिस्थितीमुळे दोन्ही कुटुंबांना लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागली असली तरी अमिता यांना खात्री आहे की लग्न लवकरच होईल. "स्मृती आणि पलाश दोघेही त्रासात आहेत. पलाशने त्याच्या वधूसोबत घरी येण्याचे स्वप्न पाहिले होते. मी एक खास स्वागताची योजना देखील आखली होती... सर्व काही ठीक होईल, लवकरच लग्न होईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.फिल्मफेअरशी बोलताना पहिल्यांदाच आपले मौन सोडत, पलाशची बहीण पलकने परिस्थितीच्या भावनिक ओझ्याबद्दल आणि लोकांच्या प्रचंड उत्सुकतेवर भाष्य केलं. ती म्हणाली, "मला वाटते की कुटुंबे खूप कठीण काळातून जात आहेत आणि मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते की या काळात आपण सकारात्मकतेवर विश्वास ठेवू इच्छितो."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.