मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या दिल्लीत आहे. यावेळी पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकत्र आल्याची माहिती आहे. एका विवाह सोहळ्यात दोघेही एकत्र आले असून त्यावेळी त्यांच्यात काही चर्चा झाली का? याबाबत माहिती अद्याप पुढे आलेली नाही. मात्र, दोघेही लग्न कार्यक्रमात एकत्र दिसल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. पंतप्रधान मोदींच्या लग्नातील उपस्थितीतीचा एक व्हिडीओसुद्धा समोर आला आहे.
या व्हिडीओत दिसतंय त्याप्रमाणे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग देखील या लग्न सोहळ्याला उपस्थित आहेत. खरं तर दिल्लीमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या मेहुण्याचा विवाहसोहळा पार पडतो आहे. या सोहळ्याला पंतप्रधान मोदी तसेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. एकीकडे राज ठाकरे सध्या राज्यात भाजपावर टीका करत आहेत.तर दुसरीकडे एका विवाह सोहळ्यात पंतप्रधान मोदी यांनी हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पंतप्रधान मोदी यांनी राजकीय मतभेत बाजुला ठेऊन या सोहळ्याला उपस्थिती दर्शवल्याने अनेक चर्चाही रंगू लागल्या आहेत. दरम्यान, जरी दोघेही एका विवाह सोहळ्यात एकत्र दिसले असले, तरी यावेळी त्यांच्यात काही चर्चा झाली आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. व्हिडिओत दिसतं आहे. त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेजवर जाऊन नववधू आणि नवरदेवाला शुभेच्छा देत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.