नांदेडमधून मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील माहूर तालुक्यातल्या शेकापूर येथील जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षक दारू पिउन शाळेत आला असल्याचे उघड झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ विद्यार्थ्यांच्या पालकांनीच शाळेत जाऊन चित्रित केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातल्या शेकापूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये एका शिक्षकाने मध्यधुंद अवस्थेत राडा घातला. अनंत वर्मा असं या शिक्षकाचं नाव असून हा शिक्षक शाळेत दारू पिऊन आला. त्यानंतर दारूच्या नशेत नाचत होता, उद्धटपणे इतरांशी बोलत होता. चालू वर्गात अशाप्रकारे शिक्षकाचा धिंगाणा सुरु असल्याने विद्यार्थ्यांनी पालकांना घडलेली घटना सांगितली.घटनेची सत्यता तपासण्यासाठी पालक स्वतः शाळेत गेले असता, अनंत वर्मा हा दारू पिऊन वर्गात फिरत असल्याचे दिसले. शिवाय चालू वर्गात शिक्षकाने नाचत धिंगाणा घातला. स्वतःला सांभाळता येत नाही अश्या अवस्थेत हा शिक्षक व्हिडीओत चित्रित झाला आहे. या घटनेबाबत पालकांनी संताप व्यक्त केला आहे. मुलं शाळेत सुरक्षित आहेत का असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान या शिक्षकावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली नाही. आता या शिक्षकाच निलंबन होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.