नरेंद्र मोदी यांच्यानंतर भारताचा पुढचा पंतप्रधान कोण असेल? देशालाच नव्हे तर संपूर्ण जगात प्रश्नाची चर्चा असते. अशातच नरेंद्र मोदी यांच्यानंतर भारताचा पंतप्रधान कोण होईल याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी खुलासा केला आहे. या प्रश्नावर सरसंघचालकांनी अत्यंत महत्वाचे विधान केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) चा शताब्दी सोहळा तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत उपस्थित होते. उपस्थित स्वयंसेवकांनी त्यांना अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारले, ज्यांची उत्तरे मोहन भागवत यांनी दिली. कार्यक्रमादरम्यान काही स्वयंसेवकांनी नरेंद्र मोदींनंतर पुढचा पंतप्रधान कोण असेल असा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाचे उत्तर देताना मोहन भागवत म्हणाले की भाजप आणि मोदी या विषयावर चर्चा करून निर्णय घेतील. यामुळे पुढचा पंतप्रधान कोण असेल हे ठरवण्यात मोदी यांचे मत निर्णायक असेल.आपल्या भाषणात मोहन भागवत यांनी तामिळनाडूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तुलनेने मर्यादित उपस्थितीवरही भाष्य केले. त्यांनी सांगितले की तामिळनाडूमध्ये राष्ट्रवादी भावना 100 अस्तित्वात असताना, काही कृत्रिम अडथळे या भावनेच्या उघड अभिव्यक्तीला रोखत आहेत. भागवत म्हणाले की हे कृत्रिम अडथळे फार काळ टिकणार नाहीत. त्यांना दूर करण्यासाठी आपण एकत्र काम केले पाहिजे. त्यांनी असेही सांगितले की तामिळनाडूचे लोक संस्कृती, परंपरा आणि राष्ट्रीय हितासाठी समर्पित आहेत आणि या मूल्यांना आणखी बळकटी देण्याची आवश्यकता आहे.भागवत यांनी त्यांच्या भाषणात भाषिक विविधता आणि सांस्कृतिक अभिमानाचाही जोरदार संदेश दिला. त्यांनी विचारले की तामिळनाडूतील लोकांना तामिळमध्ये स्वाक्षरी करण्यास का संकोच वाटावा? सर्व भारतीय भाषा आपल्या स्वतःच्या भाषा आहेत. त्यांनी लोकांना घरी त्यांच्या मातृभाषेत संवाद साधण्याचे, ते जिथे राहतात त्या ठिकाणाची भाषा शिकण्याचे आणि त्यांच्या पारंपारिक जीवनशैलीचे कौतुक करण्याचे आवाहन केले. दक्षिण भारतीय राज्यांच्या संस्कृतीचे कौतुक करताना भागवत म्हणाले की, येथील लोक त्यांचे पारंपारिक पोशाख, भाषा कधीच विसरत नाहीत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.