Big Breaking! बीडमधून धक्कादायक बातमी! शिक्षण घोटाळा उघड; मुंडेंच्या संस्थेचं कॉलेज फक्त पेपरवर, जागेवर काहीच नाही
बीडमध्ये शिक्षण घोटाळा समोर आला आहे. मुंडेंच्या संस्थेचं कॉलेज पेपरवर आहे, जागेवर काहीच नाही. धक्कादायक म्हणजे हॉल तिकीटावर परीक्षा केंद्र वेगळं, परीक्षा वेगळ्याच ठिकाणी. पैसे द्या, कॉपी करा, पास व्हा, बारावी परीक्षा पास होण्याचा बीड पॅटर्न समोर आला आहे. बीड जिल्ह्याच्या परळी येथील यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे 12 वी च्या परीक्षा सुरू आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे चक्क सेंटरचं ठिकाणं हॉलतिकीटवर एक अनं परीक्षा देण्यासाठी दुसरं असा प्रकार उघडकीस आला आहे. 12 वी च्या परीक्षेच्य पहिल्याच पेपर दिवशी शिक्षण विभागाच्या डोळ्यात धूळ टाकत बीड जिल्ह्याच्या परळी येथील यशवंतराव चव्हाणा कनिष्ट महाविद्यालय परळी येथे मात्र सर्व नियम धान्यावर ठेवले असल्याचे दिसून येत आहे.
परळी तालुक्यात एकूण 11 सेंटरवर 5000
विद्यार्थी बोर्डाची परीक्षा देण्यासाठी सज्ज झाले आहेत, सकाळी 11
वाजल्यापासून पहिला पेपर सुरू देखील झाला. ज्या शाळेला परीक्षा सेंटर नाही
त्या शारदा विद्यामंदिर माध्यमिक विद्यालय, जिरेवाडी या ठिकाणी चक्क
शाळेतील मुलांना सुट्ट्या देत घरी बसवण्यात आले आहे. आणि या शाळेत यशवंतराव
चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात परळी वैजनाथ या सेंटर वर 12 वी बोर्ड चे मुले
घेऊन जाऊन त्यांच्या परीक्षा घेतल्या जात आहेत.
घोटाळा कसा सुरु होतो?
यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय (कला, वाणिज्य, विज्ञान)संस्था- नाथ शिक्षण संस्था परळी वैजनाथसंस्थाचालक- धनंजय मुंडेकागदोपत्री असलेली ही शाळा, जमिनीवर अस्तित्त्वाच नाही..मग या कॉलेजच्या मुलांची परीक्षा कुठे होतेय...?एका शाळेत...ग्रामीण भागातल्या एका शाळेत...जी सेंटरच नाही...शारदा माध्यमिक आणि प्राथमिक विद्यालय, जिरेवाडी.मग शाळेतली मुलं गेली कुठं? तर शाळेनं मुलांना आणि शिक्षकांना सुट्ट्या देऊन टाकल्याशहरातलं एकही केंद्र संवेदनशील नाही, तरी केंद्र कसं बदललं?जिल्हाधिकारी- विवेक जॉन्सन हे काय कारवाई करणार?परळी तालुक्यात एकही केंद्र संवेदनशील नाही अशी कबुली खुद्द येथील शिक्षण विभागाचे अधिकारी गिरी यांनी दिली आहे. ज्या सेंटरला परवानगी आहे त्याच सेंटरवर बोर्डाच्या परीक्षा घेण्यात याव्या त्याच्या व्यतिरिक्त कुठेही परीक्षांचे ठिकाण बदलण्याची परवानगी कोणालाही नसल्याचेही सांगण्यात आले आहे. या सर्व नियमांना केराची टिपली दाखवत यशवंतराव चव्हाणा कनिष्ठ महाविद्यालय कला वाणिज्य आणि विज्ञान या तीन विभागाचे कॉलेज असून हे कॉलेज परळी शहरात असल्याचं त्या कॉलेज ठिकाणच्या बोर्डवर नमूद देखील करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.