Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking ! सुनेत्रा पवार होणार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा; अध्यक्ष निवडीचा मुहूर्तही ठरला?

Big Breaking ! सुनेत्रा पवार होणार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा; अध्यक्ष निवडीचा मुहूर्तही ठरला?
 

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार, अशी चर्चा रंगली होती. आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून अध्यक्ष निवडीचा मुहूर्तही ठरल्याची माहिती मिळालीय. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा पहिला ठराव पुण्यातून एकमताने मंजूर झाला आहे. अध्यक्ष निवड प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झालीय.

राष्ट्रवादीच्या घटनेतील संबंधित तरतुदींनुसार राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त झाले तर पक्षाच्या अधिकृत यंत्रणेला योग्य ठरावाद्वारे नवीन अध्यक्ष निवडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांची या पदावर निवड करावी, असा पहिला ठराव पुण्यात मंजूर करण्यात आला आहे. पुणे महापालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या बैठकीत हा ठराव करण्यात आलाय. असे वृत्त सरकारनामा वृत्तसंस्थेनं दिलंय. दरम्यान पुणे महापालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या बैठकीत हा ठराव करण्यात आला. 
 
हा ठराव पुढील कार्यवाहीसाठी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीकडे पाठवण्यात आलाय. महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते ॲड. नीलेश निकम यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीला पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप, सुनील टिंगरे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. अध्यक्षपदासाठी यापूर्वी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची नावे पुढे आल्याने जोरदार चर्चा सुरू होती.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.