पुणे :- पोलीस की दलाल? मदत मागायला आलेल्या तरुणीला पाठवलं बुधवार
पेठेत, पोलीस ठाण्यातच 'सौदा'; निलंबन अन् कोंम्बिग ऑपरेशनचा दिखावा
बुधवार पेठेतील रेड लाईट परिसरातील बेकायदेशीर हालचालींवर लगाम घालण्यासाठी पोलिसांनी मध्यरात्री कोंम्बिंग ऑपरेशन राबविले. या कारवाईत ४१ इमारतींची झडती घेण्यात आली; तर शेकडो महिला-पुरुषांची तपासणी करण्यात आली. कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन बांगलादेशी महिला आणि काही अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले आहे. तर, अमली पदार्थासह एकाला अटक करण्यात आली. शहरातील बुधवार पेठेतील रेड लाईट परिसरात अवैध धंदे सुरू असून, काही बांगलादेशी महिला आणि अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पुणे पोलिसांकडून जे कोम्बिंग ऑपरेशन राबवलं गेलं ते एका महिला पोलीस हवालदारावर झालेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर. महिला पोलीस हवालदारच बुधवार पेठेत तरुणींचा सौदा करत असल्याने तिला निलंबित केलं. यानंतरच पोलिसांकडून बुधवार पेठेत कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं. पण पोलिसांकडून निलंबनाची कारवाई आणि कोम्बिंग ऑपरेशनचा दिखावा केला जात असल्याचं म्हटलं जातंय.
मदतीसाठी आलेल्या तरुणीचा पोलीस ठाण्यातच सौदा करण्यात आल्याचं समोर आलं होतं. तरुणी मदतीसाठी पोलीस ठाण्यात पोहोचली होती. मात्र तिला मदत करण्याऐवजी तिला पुन्हा बुधवार पेठेत वेश्याव्यवसायात ढकलल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पोलिसांनी चौकशी न करता तिचाच पुन्हा सौदा केला. शुक्रवार पेठेत पोलीस चौकी आहे, या चौकीतील एक महिला हवालदारच मुलींचा सौदा करत होती. तिच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. पोलीसच वेश्याव्यवसायात सहभागी असल्याच्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून असे प्रकार होत असल्याचं समोर येताच महिला हवालदाराला निलंबित केलं गेलं. पण एक महिला हवालदार एकटी हे करू शकते का? तिच्यामागे आणखी कोण होतं? याचा तपास करण्याची आता गरज व्यक्त करण्यात येतेय.पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा आणि परिमंडळ एकच्या अंतर्गत मंगळवारी (ता. १०) धडक कारवाई केली. या ऑपरेशनसाठी सहा पोलिस उपायुक्तांसह विविध पोलिस ठाण्यांतील आणि गुन्हे शाखेतील पथके तैनात करण्यात आली. या मोहिमेत आठ सहाय्यक आयुक्त, १९ पोलिस निरीक्षक, ५५ सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक तसेच सुमारे ३७५ पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. कारवाईदरम्यान, परिसरातील एकूण ४१ इमारतींची तपासणी करण्यात आली. यामध्ये ४२६ महिला आणि २९० पुरुषांची चौकशी करण्यात आली. याशिवाय पाच ठिकाणी नाकाबंदी करून ४५९ पुरुष आणि ३२ वाहनांची तपासणी केली.
पोलिस
आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे
अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, परिमंडळ
एकचे उपायुक्त कृषिकेश रावळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
पोलिस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि स्थानिक पोलिस ठाण्यांतील अधिकाऱ्यांनी
कारवाईत सहभाग घेतला. पोलिसांकडून अशा प्रकारची धडक कारवाई पुढेही सुरू
राहील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
दोन बांगलादेशी महिला ताब्यात
नाकाबंदीदरम्यान, रामेश्वर बिभीषण बिराजदार (वय ३१, रा. बाजीराव रस्ता; मूळ रा. तांबरवाडी, ता. औसा, जि. लातूर) याच्या ताब्यातून सात ग्रॅम चरस आणि तीन इंजेक्शन जप्त करण्यात आले. तसेच, दोन संशयित बांगलादेशी महिलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.