Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली:- वरिष्ठांचे आदेश धुडकावून लावत मनमानी कारभार, जतचे सहाय्यक निबंधक अमोल डफळे निलंबित

सांगली:- वरिष्ठांचे आदेश धुडकावून लावत मनमानी कारभार, जतचे सहाय्यक निबंधक अमोल डफळे निलंबित
 

ईश्वरपूर : सहकार विभागात काम करताना वरिष्ठांचे आदेशही धुडकावून लावत तसेच त्यांची पूर्वपरवानगी न घेता मनमानी कारभार करणाऱ्या जत तालुक्याचे सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक अमोल डफळे यांना मंगळवारी निलंबित करण्यात आले.

शासनाचे अवर सचिव सुनील आगारकर यांनी हा शासननिर्णय जारी केला. सध्या जत येथे सहाय्यक निबंधक म्हणून सेवेत असणाऱ्या अमोल डफळे यांना शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दणका दिला. त्यांच्यावर विविध गोष्टींसाठी ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये सेवेत असताना डफळे यांनी अप्पर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीची पूर्वपरवानगी न घेता संस्थांच्या नोंदणी केल्या आहेत. मुचंडी येथील जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या शेंगा उत्पादक सहकारी संस्थेची नोंदणी रद्द झाली असतानाही स्वत:च्या स्वाक्षरीने परिसमापक म्हणून बेकायदेशीरपणे संस्थेवर स्वत:चीच नियुक्ती करून घेत संस्थेच्या मालमत्तेची विक्री केली, असाही ठपका आहे.

नेर्ले येथील विजय वराह पालन आणि उत्पादक शेतकरी सोसायटीच्या जमीन विक्रीतही डफळे यांच्यावर दोषारोप बजावण्यात आले आहेत तसेच या संस्थेच्या जमीन विक्रीच्या अनुषंगाने त्यांच्यावर पोलिसांत गुन्हासुद्धा दाखल झाला आहे. त्यामुळे अमोल डफळे यांची वरील कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमाचा भंग करणारी असल्यामुळे त्यांना १७ फेब्रुवारीच्या आदेशाने सेवेतून निलंबित करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. व्यक्तिगत उद्योग करता येणार नाही. निलंबन काळात डफळे यांचे मुख्यालय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा येथे राहणार आहेत. या काळात डफळे यांना व्यक्तिगत उद्योग, व्यवसाय किंवा अन्य नोकरी करता येणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.