Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वैभव सूर्यवंशीची पहिल्याच पेपरला दांडी, बोर्डाची परीक्षा बुडवली, प्रिन्सिपलनी थेट ॲबसेंटी मार्क केली

वैभव सूर्यवंशीची पहिल्याच पेपरला दांडी, बोर्डाची परीक्षा बुडवली, प्रिन्सिपलनी थेट ॲबसेंटी मार्क केली
 

टीम इंडियाचा अंडर 19 खेळाडू वैभव सूर्यवंशीने आपली 10 वीची परीक्षा बुडवली आहे. वैभव सूर्यवंशी आज सीबीएससी बोर्डाचा पहिला पेपर होता. पण हा पेपर देण्यासाठी वैभव सूर्यवंशी पोहोचलाच नाही.त्यामुळे प्रिन्सिपलने त्याची ॲबसेंटी मार्क केली आहे.

खरं तर वैभव सूर्यवंशीने परिक्षेचा फॉर्म भरला होता,त्याचं हॉलतिकीटही त्याला देण्यात आलं होतं.त्यानंतर तो परिक्षेला हजर झाला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सीबीएससीच्या दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेला आज 17 फेब्रुवारी 2026 पासून सूरूवात झाली आहे. ही परीक्षा 11 मार्च 2026 पर्यंत असणार आहे. या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी आज वैभव सूर्यवशी परिक्षेला हजर नव्हता. विशेष म्हणजे परीक्षेसंदर्भातील सगळ्या प्रक्रिया पुर्ण केल्यानंतरही तो हजर न राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

वैभवने त्याच्या बोर्डाच्या परिक्षेचा फॉर्म सबमीट केला होता आणि त्याचं हॉलतिकीट देखील त्याला देण्यात आलं होतं. त्याच्या बोर्डाच्या परिक्षेचे केंद्र हे पोदार इंटरनेशनल स्कुल होते. असं सगळं असताना देखील तो बोर्डाचा पहिला पेपर द्यायला आला नव्हता, अशी माहिती शाळेने दिली आहे. आज तो गैरहजर होता. परीक्षा केंद्रावर तो आलाच नाही. त्यामुळे आम्ही सीबीएससीच्या नियमानुसार त्याला गैरहजर मार्क केले आहे.तसेत वैभव सूर्यवंशीकडून आम्हाला या मागचं कुठलंही ठोस कारण सांगण्यात आलं नाही आहे. आणि असे खरं तर कोण सांगत पण नाही.त्यामुळे आम्हाला त्याला गैरहजर ठरवता येते. हेच त्याच परीक्षा केंद्र आहे. आणि आम्ही अपेक्षा केलेली की तो येईल आणि परीक्षा देईल. पण कदाचित त्याच्यावर क्रिकेट मॅच, प्रॅक्टीस किंवा आता आयपीएल देखील सूरू होणार आहे.त्यामुळे कदाचित तो त्यात व्यस्त असेल. पण आता पुढचा पेपर असेल तेव्हा तो नक्कीच येईल अशी मला आशा आहे,असे पोदार इंटरनेशनल स्कुलचे प्रिंसिपल एनके सिन्हा यांनी सांगितले आहे



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.