सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचा राजीनामा राज्याचे मुख्य सचिवांना मिळाला आहे. मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचा राजीनामा राज्याचे मुख्य सचिव यांना मिळाल्यानंतर सचिवांकडून पुढील प्रक्रियेला सुरुवात करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अतुल चव्हाण यांच्याबाबत लोकप्रतिनिधींकडून प्राप्त तक्रारींची चौकशी सुरू झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
अतुल चव्हाण हे भाजप आमदार अनुराधा चव्हाण यांचे पती
अतुल चव्हाण हे भाजप आमदार अनुराधा चव्हाण यांचे पती आहेत.पदोन्नतीच्या नाराजीतून राजीनामा दिल्याची चर्चा असली तरी त्यांना अपेक्षित पदन्नोतीत इतर ही अधिकारी असल्याने त्यांना आताच मिळणे शक्य नसल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. अतुल चव्हाण यांच्याबाबत लोकप्रतिनिधींकडून प्राप्त तक्रारींची चौकशी सुरू झाल्याची माहिती आहे.
चार वर्षे आधीच त्यांनी राजीनामा दिला
अतुल चव्हाण यांच्या पत्नी अनुराधा चव्हाण या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार आहेत. एकाच कुटुंबात राजकारण आणि प्रशासनातील महत्त्वाची पदे असल्याने काहींनी शासनाकडे त्यांच्याविरोधात तक्रारी केल्याची चर्चा आहे. या राजकीय घडामोडींनंतर शासनाने 22 जून रोजी चव्हाण यांची नगर परिषद प्रशासन संचालनालय, वरळी (मुंबई) येथे मुख्य अभियंता म्हणून बदली केली होती आणि त्यांना 31 जुलै रोजी तेथे रुजू होण्याचे आदेश देण्यात आले होते. सचिवपदाच्या पदोन्नतीसाठी पात्र असल्याने त्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती. पदोन्नतीची फाईल शासनदरबारी सादरही झाली होती; मात्र 31 जुलैच्या सायंकाळपर्यंत त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. पात्र अधिकाऱ्यांना डावलून इतरांना संधी दिली जात असल्याच्या नाराजीतून चव्हाण यांनी 32 वर्षांची सेवा थांबवण्याचा निर्णय घेतला. शासकीय नियमानुसार ते मार्च 2030 मध्ये सेवानेवृत्त होणार होते, मात्र चार वर्षे आधीच त्यांनी राजीनामा दिला.
अतुल चव्हाण यांनी 16 ऑगस्ट 1994 ते 31 जुलै 2026 या कालावधीत शासकीय सेवा बजावली
दरम्यान, अतुल चव्हाण यांच्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी 16 ऑगस्ट 1994 ते 31 जुलै 2026 या कालावधीत शासकीय सेवा बजावली. 2000 मध्ये त्यांची कार्यकारी अभियंतापदी निवड झाली होती. अष्टविनायक दर्शन मार्गाचे काम अवघ्या 24 तासांत पूर्ण करणे, समृद्धी महामार्ग, विद्यापीठातील डिजिटल स्टुडिओ आणि कोल्हापूर सर्किट बेंचच्या वास्तूचे अल्पावधीत पुनर्निर्माण ही त्यांची उल्लेखनीय कामे ठरली. 2010 मध्ये त्यांना 'उत्कृष्ट अभियंता' पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.