केंद्रीय शिक्षणमंत्री यांचा राजीनामा, त्यानंतर शहजाद पुनावाला यांनी शुक्रवारी तडकाफडकी राजीनामा दिला. त्यानंतर आता भाजपला आणखी एक मोठा हादरा बसला आहे. बिहारमधील भाजपच्या बड्या नेत्याने आणि आमदाराने राजीनामा दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भाजपचे विधान परिषदेचे आमदार देवेश कुमार यांनी राजीनामा दिला. देवेश कुमार यांनी आपला राजीनामा विधान परिषदेचे सभापती अवधेश नारायण सिंह यांच्याकडे सोपवला. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता रिक्त झालेली जागा कुणाला मिळणार यावर चर्चा सुरू झाली आहे. देवेश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर मंत्री दीपक प्रकाश चर्चेत आले आहेत. देवेश कुमार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर दीपक प्रकाश यांची विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते असे सांगितले जात आहे.
दीपक प्रकाश यांच्या मंत्रिपदावरील नियुक्तीचे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचल्यानंतर भाजप या प्रकरणात सक्रिय झाला आहे. देवेश कुमार यांचा विधान परिषदेच्या जागेचा राजीनामा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या निर्णयामुळे दीपक प्रकाश यांच्या विधान परिषदेवरील निवडीचा मार्ग मोकळा होऊ शकतो आणि त्यांच्या मंत्रीपदाला घटनात्मक संरक्षण देण्याचे प्रयत्न केले जाऊ शकते असे सांगितले जात आहे.
देवेश कुमार हे मागच्या दारातून विधान परिषद अध्यक्षांच्या दालनात गेले. त्यांनी अध्यक्ष अवधेश नारायण सिंह यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आणि तिथून निघून गेले. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी आणि इतर नेते पुढच्या दरवाज्यातून अध्यक्षांकडे पोहोचले. राजीनामा सादर केल्यानंतर देवेश कुमार तिथून तात्काळ निघून गेले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी हे देखील विधान परिषदेतून बाहेर पडले. देवेश कुमार यांच्या राजीनाम्यावरून बिहारच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.