गेल्या अनेक दिवसांपासून गायक विशाल ददलानी सामाजिक आणि राजकीय विषयांवर सातत्याने आपली भूमिका मांडताना दिसतोय.. आता त्याने नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत त्यांच्यावर टीका केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता.
या व्हिडिओत त्यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान काही विद्यार्थ्यांनी वापरलेल्या भाषेबद्दल आणि त्यांच्या आईबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा उल्लेख केला होता. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर गायक विशाल ददलानीने तो शेअर करत पंतप्रधानांवर निशाणा साधला. "टिअर गॅसचा मारा झाला, लाठीचार्ज झाला, गोळीबार झाला त्याचा राग नाही; पण शिव्या दिल्या म्हणून इतकं दुःख झालं का?" असा सवाल त्याने उपस्थित केला.
गोळीबार चालला तरी चालेल, पण शिव्या दिल्यावर संस्कारांचा प्रश्न?
विशालने शेअर केलेल्या व्हिडिओत तो म्हणाला, "हॅलो फ्रेंड्स..आज मला तुमच्याशी लांबत लांब गप्पा मारायचा आहे..तयार आहात ना! टिअर गॅसचा मारा झाला, लाठ्या पडल्या, गोळ्या झाडल्या गेल्या असल्या तरी काय झालं? पण देशातील तरुणांनी शिव्या दिल्या तर देशाचे संस्कार कुठे चालले आहेत, असा प्रश्न विचारला जातो. विचार करा, यामुळे मनाला खूप वेदना झाल्या म्हणे. पण गोळीबार झाला, लोकांचं नुकसान झालं, त्याचं काही नाही. तुमच्या घरात गुंड पाठवले जातील, एफआयआर दाखल केले जातील, त्याचंही काही नाही. ती काय फार मोठी गोष्ट नाही. स्वतःचा आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांनाही चिरडलं जाईल. लोकांमध्ये संताप आहे, पण त्याचा अर्थ शिवीगाळ नाही."
पुढे तो म्हणाला, "काहींना वाटलं की पेपरफुटी झाली, विद्यार्थ्यांचे करियर उध्वस्त झाले. विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, पालकांची मेहनत वाया गेली, यामुळे लोक संतप्त आहेत. पण त्यावर आक्रोश नाही; फक्त शिव्या दिल्या म्हणून राग व्यक्त केला जातो. शिव्या मुलींनी दिल्या, असं विशेष नमूद करणंही चुकीचं आहे. मुलं आणि मुली यांच्यात असा फरक करणं हे स्त्रीविरोधी मानसिकतेचं लक्षण आहे."
'हा अहंकार सोडा, PR कमी करा'
विशाल पुढे म्हणाला, "एक मित्र म्हणून एवढंच सांगू इच्छितो की हा अहंकार सोडा. PR कमी करा. या विचित्र रील्स बनवणं थांबवा. चांगले लेखक घ्या आणि ज्या चांगल्या कलाकारांना तुम्ही ठेवले आहे, त्यांना पुढे आणा."शेवटी तो म्हणाला, "जर लोकांशी नातं जोडायचं असेल तर ते खरं आणि प्रामाणिक असू द्या. आंदोलन विनोदी शैलीत झालं असलं तरी देशातील तरुण प्रेमाने भरलेले आहेत. तुम्ही शिक्षण व्यवस्थेसाठी काही चांगलं काम केलंत, तर हेच विद्यार्थी तुमचं गुणगान गातील. सतत रील्स आणि व्हिडिओ बनवण्यापेक्षा काहीतरी चांगलं काम करा."हा व्हिडिओ शेअर करत विशाल ददलानीने कॅप्शनमध्ये लिहिलं, "एका मित्राकडून दुसऱ्या मित्राला... #Education #Gaslighting #NEET".
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.