🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरील फिंगरप्रिंट्स बघायचेत", राज ठाकरेंनी तंत्रशिक्षण मंत्र्यांची काढली पिसं

"मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरील फिंगरप्रिंट्स बघायचेत", राज ठाकरेंनी तंत्रशिक्षण मंत्र्यांची काढली पिसं


"एकाने नुसतंच केसाला तेल चोपडलं पण मात्र बुद्धी आली नाही. प्रत्येक केस स्वतंत्र उमेदवारासारखा उभा असतो. हे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री आहेत. आपण काय बोलतो, हे महाराष्ट्राचे मंत्री म्हणतात की, दगडावरील फुटप्रिंट्स ज्याला त्यांना फिंगरप्रिंट्स म्हणायच्या होत्या

त्या प्रिंट्स आता आधारशी लिंक करणार आहेत, ते कसं? मला चंद्रकांत पाटील यांच्या मेंदूवरील फिंगरप्रिंट्स पाहायचे आहेत," असं म्हणत राज ठाकरे यांनी 1 ऑगस्ट 2026 रोजी मनसेचा वर्धापन दिन सोहळ्यादरम्यान चंद्रकांत पाटलांवर मिश्कील टोला लगावला.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
भाषण सुरू असताना राज ठाकरे म्हणाले की, "इंग्रजी बोलणारी ही केवळ जेन झी नसतात, 1997 नंतर जन्मलेली मुलं ही जेन झी असतात. मुंबई, पुण्याचे केवळ जेन झी नसतात, ते ग्रामीण भागात देखील असतात. त्यांच्या मागणी आपण समजून घेणं गरजेचं असतं", असं म्हणत राज ठाकरे यांनी भाषणाची सुरूवात केली.
चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा राज ठाकरेंकडून समाचार

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, दिल्लीतील आंदोलनादरम्यान फेकण्यात आलेल्या दगडांवर मुलांच्या बोटांचे ठसे फिंगरप्रिंट्स पोलिसांनी गोळा केले असून ते आधारकार्डशी जोडणार आहेत, असं वक्तव्य केलं होतं. त्याचाच दुजोरा देत राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांची पिसं काढली आहेत.

"चंद्रकांत पाटील यांच्या मेंदूवरील फिंगरप्रिंट्स पाहायचेत"
राज ठाकरे म्हणाले की, "एकाने नुसतंच केसाला तेल चोपडलं पण मात्र बुद्धी आली नाही. प्रत्येक केस स्वतंत्र उमेदवारासारखा उभा असतो. हे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री आहेत. आपण काय बोलतो, हे महाराष्ट्राचे मंत्री म्हणतात की, दगडावरील फुटप्रिंट्स ज्याला त्यांना फिंगरप्रिंट्स म्हणायच्या होत्या. त्या प्रिंट्स आता आधारशी लिंक करणार आहेत, ते कसं? मला चंद्रकांत पाटील यांच्या मेंदूवरील फिंगरप्रिंट्स पाहायचेय," असा मिश्कील टोला राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांवर लगावला.

"कोल्हापूरकरांनी ज्ञान मिळावं म्हणून या माणसाला पुण्याला पाठवलं, कारण पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे, तिथे देखील काहीही झालं नाही. आता असे शिक्षणमंत्री असल्यानंतर झेन झीचा पारा चढणार का नाही चढणार? ही अशी माणसं आमच्या नशीबी आणून ठेवली आहे," असं म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टिकेची तोफ डागली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.