🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुख्यमंत्री थलपती विजय यांचं मराठी बोलतानाचा :, पहा VIDEO

मुख्यमंत्री थलपती विजय यांचं मराठी बोलतानाचा :, पहा VIDEO 


मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी शनिवारी तामिळनाडूचे हित आणि घटनात्मक हक्कांचे खंबीरपणे संरक्षण करण्याची, तसेच एक पारदर्शक, जनस्नेही आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन उभारण्याची प्रतिज्ञा केली. फोर्ट सेंट जॉर्जच्या तटबंदीवरून राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर आपले पहिले स्वातंत्र्यदिनाचे भाषण देताना, थलपथी विजय यांनी सांगितले की, आमचे सरकार तामिळनाडूच्या जनतेच्या हिताच्या प्रशासकीय बाबींवर केंद्र सरकारला सहकार्य करेल. राज्याच्या हिताला बाधा आणणाऱ्या किंवा त्याच्या हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही निर्णयाला ते तीव्र विरोध करतील.”

विजय यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओमध्ये विजय हे मराठीत बोलताना पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये ते मराठीत भाषण करताना दिसत आहे, पण आता हे भाषण खरंच मराठीत आहे की ते आता Ai द्वारे क्रिएट केले आहे की नाही हे सांगू शकत नाही. पण व्हिडिओ बघून ते भाषण Ai ने क्रिएट केलेले असल्याचे पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री त्रिशा कृष्णन शनिवारी चेन्नईतील फोर्ट सेंट जॉर्ज येथे झालेल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला उपस्थित होत्या, जिथे तमिळ अभिनेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांनी राष्ट्रध्वज फडकवला. ट्रेडिशन लूकमध्ये त्रिशा दिसली. साडी, गजरा माळून तिने या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या कार्यक्रमातील त्यांच्या उपस्थितीने लक्ष वेधून घेतले, कारण त्यांचा सुरु असलेल्या अफवांच्या चर्चांमुळे. अभिनेत्री त्रिशा व्हीआयपी गॅलरीमध्ये, मुख्यमंत्री विजय यांचे वडील, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक एस. ए. चंद्रशेखर आणि त्यांच्या आई शोभा चंद्रशेखर यांच्या अगदी शेजारी बसलेली दिसली. सोहळ्यादरम्यान, त्रिशा मुख्यमंत्री विजय यांच्या आई-वडिलांशी अगदी सहजपणे संवाद साधताना दिसली. अभिनेत्री त्रिशा विजय थलपती यांच्या शपथविधीलाही उपस्थित होती, तर त्यांचा बर्थडे साठीही तिने खास पोस्ट शेअर केली होती.
मुख्यमंत्री थलपती विजय यांचं मराठी बोलतानाचा :, पहा 


विजय यांचा ‘जना नायकन’ हा शेवटचा चित्रपट होता. यापूर्वीच त्यांनी जाहीर केले होते की हा त्यांचा शेवटचा चित्रपट असेल आणि त्यानंतर ते पूर्णपणे आपल्या राजकीय कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करेल. या वर्षी विजय यांनी निवडणूक जिंकून ते तामिळनाडूचे मुख्यमंत्रीही झाले. मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी अनेक घोषणाही केल्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.