जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज पहाटे गोव्यात निधन झालं. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. क्रांतीविर ते नटसम्राट आपल्या भूमिकांनी थिएटर गाजवणारा नट आज काळाच्या पडद्याआड गेला.
सिनेसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नटसम्राटमधील त्यांच्या भूमिकेनं डोळ्यात पाणी आणलं तर वेलकममधील भूमिकेनं हसायलाही लावलं. क्रांतिवीर, परिंदा, यशवंत, राजनीति, नटसम्राट असे एकापेक्षा एक सिनेमे केले आणि ते सुपरहिट झाले.
नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीमध्ये आपला संघर्षमय प्रवासाबद्दल सांगितलं होतं. आयुष्यात गुरू कोण लाभले यावर उत्तर देताना नानांनी त्यांच्या खास शैलीत मिश्किल शैलीत सांगितलं होतं. ते म्हणाले, "सर्वजण मला शिकवण्याचा प्रयत्न करत राहिले, पण ते सगळे मास्तर हारले! आम्हाला कोणी शिकवूच शकलं नाही. आम्ही ग्रामीण भागात लहानाचे मोठे झालो.पाचवीत असताना एबीसीडी शिकायला सुरुवात केली. जेव्हा शहरात आलो, तेव्हा बाकीची मुलं पटकन इंग्रजी बोलायची. ते काही बोलले की मला वाटायं ते माझी थट्टा करतात. 'काय बोलतोयस?' असं विचारायचं, तेव्हा ती मुलं घाबरायची. सहावीत मला आईने मावशीकडे पाठवलं होतं, ज्या स्वतः हेडमिस्ट्रेस होत्या. पण पुढच्याच वर्षी त्यांनी मला परत पाठवलं, मी राहूदे पण त्यांचीच मुले बिघडतील! या भीतीनं त्यांनी हे केलं"
१३ व्या वर्षी नोकरी अन् १६ किलोमीटरची पायपीट
आपल्या कठीण बालपणीच्या दिवसांची आठवण सांगताना नाना म्हणाले, "मी वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षापासून नोकरी करायला सुरुवात केली होती. दररोज ८ किलोमीटर जाणं आणि ८ किलोमीटर येणं, अशी मोजून १६ किलोमीटर पायपीट करायचो. एका वेळचे जेवण आणि महिन्याला फक्त ३५ रुपये पगार मिळायचा. पण तरीही मी त्या आयुष्याचा आनंद घेतला. परिस्थिती आणि वेळ जे शिकवते, ते जगातील कोणतीही शाळा किंवा कॉलेज शिकवू शकत नाही."
'अंकुश' चित्रपट आणि 'नाना पाटेकर वॉचआऊट'चा तो किस्सा
नानांनी आपल्या सुरुवातीच्या दिवसातला एक किस्सा सांगितला होता. ते म्हणाले, जेव्हा अंकुश चित्रपट रिलीज झाला, तेव्हा सह-निर्माते आणि दिग्दर्शक एन. चंद्रा यांनी एक वेगळंच पोस्टर छापलं होतं. नाना पाटेकर वॉचआऊट असं. तेव्हा मला कोणीही ओळखत नव्हतं. मी दादरपासून वांद्रेपर्यंत चालत जाऊन प्रत्येक ठिकाणी ते पोस्टर पाहत राहायचो. त्यानंतर मला जाणीव झाली की, सिनेमाच्या माध्यमातून आपण समाजात बरेच काही मांडू शकतो."
''रीटेक झाला की अपमान वाटतो!"
प्रकाश झा यांच्यासोबतच्या कामाच्या अनुभवाबद्दल बोलताना नाना म्हणाले, "प्रकाश झा यांच्या संवादांची हिंदी भाषा खूप क्लिष्ट असते, त्यामुळे खूप होमवर्क करावा लागायचा. मला काम करता करता मला ५० वर्षे झाली. जर दिग्दर्शकाने ओके म्हटलं आणि मला वाटलं, तर मी स्वतः दुसरा टेक मागेन. पण जर माझ्या शब्दोच्चारात गफलत झाल्यामुळे रीटेक घ्यावा लागला, तर मला स्वतःचाच अपमान झाल्यासारखा वाटायचा."
प्रहारनंतर पुन्हा दिग्दर्शन का केले नाही?
प्रहार सारखा उत्कृष्ट चित्रपट दिल्यानंतर पुन्हा दिग्दर्शन का केले नाही, यावर उत्तर देताना नाना भावूक झाले. ते म्हणाले, "मला घर बांधण्यासाठी पैशांची गरज होती. दिग्दर्शन करण्यात खूप वेळ जातो. जर चित्रपट चालला नाही, तर माणूस अभिनेताही राहत नाही आणि दिग्दर्शकही. तो धोका पत्करण्याची माझी हिंमत नव्हती. मी खूप गरिबी पाहिली होती, त्यामुळे मी पैसे कमवण्याच्या मागे लागलो. नंतर चांगले दिग्दर्शक भेटत गेले, त्यामुळे मी काही मिस करतोय असं वाटलं नाही."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.