Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

‘श्री. १००८ भगवान नेमिनाथांच्या’ जयघोषाने नेमिनाथनगर मध्ये पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

‘श्री. १००८ भगवान नेमिनाथांच्या’ जयघोषाने नेमिनाथनगर मध्ये पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न


सांगली :
  गळ्यात नादमय टाळ - मृदुंगांचा निनाद करीत... हातामध्ये पंचरंगी जिनध्वज धारण करून... पायी चालताना हजारो श्रावक-श्राविकांच्या मुखातून केलेला श्री. १००८ भगवान नेमिनाथांचा अखंड गजर, प्रचंड जयघोष तसेच पालखी मार्गावर ठीक ठिकाणी भक्तांचा उत्साही सहभाग अशा भक्तीभावपूर्ण वातावरणात सांगलीतील नेमिनाथनगर मध्ये अनंत चतुर्थीच्या उपलक्ष श्री. १००८ भगवान नेमिनाथांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.         

        नेमिनाथनगर येथील श्री. १००८  नेमिनाथनगर दिगंबर जिन मंदिर येथे जैन समाजातील सर्वात पवित्र उत्सव ‘पर्युषण पर्व’ हा मोठ्या उत्साह व भक्ती भावाने सुरू होता. त्याचा सांगता समारोह श्री. १००८ भगवान नेमिनाथांच्या पालखी सोहळ्याने आज नेमिनाथनगर येथे संपन्न झाला. या पालखी सोहळ्यासाठी बँड, फुलांनी सजवलेला रथ, १६ घोडे, हजारो श्रावक- श्राविका व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. पालखी सोहळ्याच्या मार्गावरून अनेक भक्तांनी भगवंताची पूजा-अर्चना केली.  तसेच या पालखी सोहळ्या निमित्त राजमती भवन येथे आयोजित केलेल्या महाप्रसादाचा २ हजारहून अधिक लोकांनी लाभ घेतला.

         गेल्या दहा दिवसापासून राजमती महिला मंडळाच्या अध्यक्षा- प्रिया पाटील, उपाध्यक्षा – प्रिती पाचोरे, सेक्रेटरी – प्रिया पाचोरे, खजिनदार- सीमा पाटील, सहसचिव- प्रियांका उपाध्ये यांनी श्री. १००८ भगवान नेमिनाथ यांच्या भव्य पालखीचे सुयोग्य नियोजन केले होते. त्याचप्रकारे शांतीनाथ कांते, बाबासाहेब पाटील, उदय पाटील, सुभाष देसाई, वसंत पाटील, आदिनाथ उपाध्ये, दीपक चौगुले, प्रशांत पाटील, शरद पाटील, संजय किणीकर, राजेश खवाटे, गौतम पाटील, प्रकाश पाचोरे, दीपक पाटील, अनिल चोगुले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.