सध्याच्या सरकारचे अस्तित्व शून्य:एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊन अडीच महिने झालं
पण ते फक्त दही हंडीच फोडत आहेत- राजू शेट्टी
वाशिम ता.१५: गेल्या दोन महिन्यात राज्यात प्रचंड अतिवृष्टी झाली आहे. तर काही ठिकाणी ढगफुटी झाली आहे. जनावरांवर लम्पीसारखा आजार आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात जाऊन यंत्रणा कामाला लावण्याची जवाबदारी पालकमंत्र्यांची असते. मात्र, जिल्ह्यांना अजूनही पालकमंत्री मिळाले नाहीत. यामुळं या सरकारचे अस्तित्व शून्य झाले असल्याचे शेट्टी म्हणाले.
महाविकास आघाडीशी आम्ही एप्रिल महिन्यामध्येच संबंध संपवून टाकला आहे. पुन्हा त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रश्नच येत नाही. इथून पुढे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी चळवळ उभी करणे हा आहे. तसेच राजकीय भूमिका आमची स्वतंत्रपणे राहील असेही राजू शेट्टी यावेळी म्हणाले. राजू शेट्टी हे वाशिम जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्रातील सरकार नेमकं कशासाठी बनले, हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहला आहे. कारण सध्या राज्यात जे राजकारण सुरु आहे त्याचा दर्जा रसातळाला गेला आहे. याची किळस आता सामान्य माणसालाही येत आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊन अडीच महिने झालं, पण ते फक्त दही हंडीच फोडत असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
