वरदविनायक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये जे महाआरोग्य शिबीर चालू आहेत
वरदविनायक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये जे महाआरोग्य शिबीर चालू आहेत त्यामधील आज गुरुवार दि १५ सप्टेंबर रोजी आळसंद पंचक्रोशी मधील चिखलगोटन, वाझर, बलवडी, तांदळगाव, जाधवनगर, आळसंद, खंबाळे या गावातील सर्व वयोगटातील महिला व पुरुषांसाठी महाआरोग्य शिबीर आयोजित केले.
या महाआरोग्य शिबिरामध्ये तज्ञ व अनुभवी डॉक्टर्स यांच्याकडून पुढील तपासणी मोफत-विनामूल्य करून देण्यात आल्या. डोळ्यांची तपासणी, दातांची तपासणी, रक्ताची सी. बी. सी तपासणी, रक्तामधील साखर तपासणी तसेच जनरल तपासणीमध्ये सर्दी, ताप, खोकला यांच्यावरील गोळ्या व औषधे डॉक्टरांच्या सल्यानुसार मोफत देण्यात आली. या सामाजिक सेवेचा सर्व वयोगटातील महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.
या सेवेसाठी डॉ. कुंभार एल. एस, डॉ. राहुल सूर्यवंशी, डॉ. राहुल माळी, डॉ. वैभव माने, डॉ. किल्लेदार यांची टीम सर्वांनी मोफत सेवा देऊन सहकार्य केले. याप्रसंगी सरकारी वैद्यकीय अधिकारी डॉ. ए .एम लवटे, डॉ. प्रकाश शिंदे, आळसंद गावच्या सरपंच, सर्वच स्थरावरील आजी-माजी राजकीय मान्यवर, सर्व सामाजिक मान्यवर, ग्रामस्थ तसेच संस्थेचे स्वयंसेवक, स्वयंसेविका यावेळी उपस्थित होते . सर्व उपस्थित मान्यवरांचे वरदविनायक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अमोल आनंदराव शिंदे यांनी आभार मानले .
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

