वेदांता फॉक्सकॉननंतर बल्क ड्रग प्रकल्प राज्याबाहेर गेला - आदित्य ठाकरे
मुंबई ता.१४: शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. आदित्य ठाकरे यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरुन काल टीका केली होती. आजच्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी बल्क ड्रग पार्क महाराष्ट्राच्या हातून गेल्याचा नवा आरोप केला. केंद्र सरकारनं गुजरात, आंध्र प्रदेश आणि हिमाचल प्रदेशला बल्क ड्रग पार्कबाबत रिपोर्ट मागवला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारला पत्र लिहिलं होतं. सुभाष देसाई यांनी हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आणला होता. आपण बल्क ड्रग पार्क महाराष्ट्राच्या रायगडमध्ये येणार होता.
आता बल्क ड्रग पार्कमध्ये हिमाचल प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये येणार आहे. पहिला प्रकल्प गुजरातच्या भरुचमध्ये येणार आहे. महाराष्ट्रानं बल्क ड्रग पार्कची मागणी पहिल्यांदा केली होती. या व्यवस्थेतील स्वत: ला घोषित करणारे मुख्यमंत्री गरागरा वेगवेगळ्या मंडळांना भेटी देत होते. उद्योगमंत्री यांना देखील हा विषय माहिती नसेल, मुख्यमंत्र्याना देखील माहिती नसेल की महाराष्ट्राचा बल्क ड्रग पार्कवर पहिला हक्क होता, तो आपल्या हातून निघून गेला आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
