गुगवाडमध्ये उसळला भीमसागर दिमाखदार सोहळ्यात धम्मभूमीचे लोकापर्ण..
महाराष्ट्रासह कनार्टकातील बौद्ध अनुयायांची उपस्थिती
सांगली: जत तालुक्यातील गुगवाड येथे चैत्यभूमी, दीक्षाभूमीच्या धतीर्वर जागतिक दजार्चे भव्य आणि दिव्य असे विपश्यना केंद्र तसेच बुद्ध विहार उभारण्यात आले आहे. शनिवारी जगभरातील भन्तेजी, महाथेरोजी यांच्या उपस्थितीत झालेल्या दिमाखदार सोहळ्यात धम्मभूमीचे लोकापर्ण करण्यात आले. कायर्क्रमस्थळी महाराष्ट्र, कनार्टकातील हजारो बौद्ध अनुयायांचा भीमसागर उसळला होता. प्रतिथयश उद्योगपती सी. आर. सांगलीकर यांच्या पुढाकाराने उभारलेल्या धम्मभूमीत हजारो लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.
उद्योगपती सांगलीकर यांचा मुलगा अथवर् याच्या स्मरणाथर् गुगवाड येथील वीस एकर परिसरात ही भव्य दिव्य वास्तू उभारण्यात आली आहे. यामध्ये विपश्यना केंद्र तसेच बुद्ध विहार धम्म उपासना केंद्र आहे. पंधरा हजार चौरस फूट बांधकाम यासाठी करण्यात आले आहे. एकावेळी सुमारे एक हजार लोक विपश्यना करू शकणार आहेत. या कायर्क्रमासाठी देश आणि जगभरातील ५०० भन्तेजी आणि ५० महाथेरोजी उपस्थित होते. राज्य तसेच देशभरातून सुमारे २५ हजारहून अधिक उपासकही यावेळी उपस्थित होते.
कायक्रमाच्या सुरवातीला उद्योगपती सी. आर. सांगलीकर म्हणाले, समाजासाठी काहीतरी भव्य दिव्य करावे अशी माझी इच्छा होती. यासाठी गेल्या पाच वषार्पासून धम्मभूमी उभारणीसाठी प्रयत्नशील होतो. या धम्मभूमीचे आज लोकापर्ण होत आहे. समाजासाठी ही भूमी सदैव उघडी राहणार आहे.
सुरुवातीला पंचशील ध्वजारोहण झाल्यानंतर बुद्ध मूतीर् आणि डॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. या विहारमध्ये थायलंड येथून आणलेल्या बुद्ध मुतीर्ची प्रतिष्ठापना भन्तेजी आणि महाथेरो यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शनिवारी सकाळी धम्मभूमी परिसरात पंचशील आणि ध्वजारोहण झाले. भदंत बोधीपालो महाथेरो, लोकोत्तरा महाविहारा चौका, यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर जयसिंगपूर येथील भदंत डॅ. यश काश्यपायन महाथेरो यांच्याहस्ते बोधी वृक्षवंदना झाली.
भदंत डॅ. उपगुप्त महाथेरो यांच्याहस्ते या धम्मभूमी विहाराचे लोकापर्ण करण्यात आले. सांगलीकर यांनी जिल्ह्यासाठी एक ऐतिहासिक कायर् केले आहे. देशभरातील तसेच जगभरातील बौद्ध धम्म उपासकांसाठी हे महत्वाचे केंद्र ठरणार असल्याचे यावेळी अनेक उपासकांनी बोलून दाखवले. राज्यातील सवार्त मोठे तिसरे विहार म्हणून त्याची गणना होणार आहे. मुंबई येथील चैत्यभूमी आणि नागपूर येथील दीक्षाभूमीनंतरचे हे सवार्त मोठे बुद्ध विहार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.