गोवा दारू विक्री करणाऱ्यांवर मोकाअंतगर्त कारवाई करा....
माहिती अधिकार कायर्कतेर् प्रभात हेटकाळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सांगली : सांगली जिल्ह्यात अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडली आहे. मिरज आणि विटा परिसरात कोट्यवधी रूपये किमतीची दारू गेल्या पंधरा दिवसांत पकडण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क मंत्री मा. शंभूराज देसाई यांनी गोवा बनावटीच्या दारूची एक बाटली जरी महाराष्ट्रात आणली तरी संबंधितांवर मोका अंतगर्त कारवाई करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात ज्या हॅटेलमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू पकडण्यात आली आहे. त्या संबंधित हॅटेल चालकांवर तसेच गोवा बनावटीची दारू आणणाऱ्यांवर तातडीने मोका अंतगर्त कारवाई करण्यात यावी. अशी मागणी माहिती अधिकार कायर्कतेर् प्रभात हेटकाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राज्य उत्पादन शुल्ककडून सांगली जिल्ह्यात वारंवार गोवा बनावटीची दारू पकडली जात असतानाही संबंधितांवर केवळ किरकोळ कारवाई करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यात ज्यांच्याकडून ही गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. त्यांच्यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. शिवाय राज्य उत्पादन शुल्कच्या ज्या विभागात अशा प्रकारची दारू पकडण्यात आली आहे. तेथील निरीक्षकांवर कतर्व्यात कसूर केल्याप्रकरणीही कडक कारवाई करावी अशी आपणास नम्र विनंती आहे.
सांगली जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकारी, कमर्चाऱ्यांना वारंवार गोवा सीमेवरील चेक नाक्यावर ड्युटी लावली जात आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात कारवाई करण्यात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. जिल्ह्यात वारंवार गोवा बनावटीची दारू सापडत आहे. शिवाय अन्यही बेकायदा व्यवसाय सुरू आहेत. गोवा सीमेवरील चेक नाक्यावर अनेक अधिकारी, वारंवार ड्युटीला जात असल्याने जिल्ह्यात म्हणावी त्या प्रमाणात कारवाई होत नाही. गोवा सीमेवरील चेक नाक्यावर अधिकारी, कमर्चारी असूनही सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू आणली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात होणाऱ्या दारू तस्करीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील अधिकारी, कमर्चाऱ्यांची चेक नाक्यावरील ड्युटी कायमस्वरूपी रद्द करावी. तसेच गोवा चेक नाक्यावर वरीष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली कायमस्वरूपी एक पथक नेमण्यात यावे अशी मागणीही हेटकाळे यांनी निवेदनात केली आहे.
सांगली राज्य उत्पादन शुल्कने गेल्या तीन ते चार महिन्यांत मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. सांगली जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी गांजावरील राज्यातील सवार्त मोठी कारवाई मिरज तालुक्यातील बेडग येथे केली होती. यावेळी एक कोटीहून अधिक रूपयांची गांजाची झाडे जप्त करण्यात आली होती. राज्यातील एवढी मोठी कारवाई केली असतानाही राज्य उत्पादन शुल्कचे संचालक सांगली जिल्ह्यात फिरकलेही नाहीत. केवळ मुंबईत बसून काम करणाऱ्या संचालकांवरही कारवाई करण्याची आवश्यकता आहे. गोवा बनावटीची दारूही मोठ्या प्रमाणात सापडत असतानाही संचालकांकडून त्याची दखल घेतली नाही. सध्याच्या संचालकांनी पदभार घेतल्यानंतर मुंबईचे कायार्लय सोडले नसल्याचे दिसून येत आहे. संपूणर् राज्याचे संचालक असूनही सध्याचे संचालक केवळ कायार्लयातूनच आदेश देण्यात मग्न आहेत. त्यांनी एकदाही राज्याचा दौरा केलेला नाही. त्यामुळे अशा अकायर्क्षम संचालकांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच एखाद्या कायर्क्षम अधिकाऱ्यांची या पदावर नव्याने नियुक्ती करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.