भारत जोडो यात्रेसाठी पुण्यात काँग्रेसकडून फ्लेक्सबाजी; पुण्यातून हजारो कार्यकर्ते होणार सहभागी
सध्या संपूर्ण भारतामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेची चर्चा सुरू आहे आणि हीच भारत जोडो यात्रा मागील सहा दिवसांपासून आपल्या महाराष्ट्र राज्यात आलेली आहे.
या यात्रेमध्ये महाराष्ट्रातील अनेक नेत्यांपासून हजारो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळतय परंतु आता या भारत जोडो यात्रेचे पुण्यात देखील मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लागले आहेत. विशेषतः काँग्रेस पुणे शहराच्या ओबीसी विभागाच्या उपाध्यक्षा मोनिका खलाणे यांच्या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये अशा प्रकारची फ्लेक्स बाजी करण्यात आलेली आहे, यामध्ये पुण्यातील टिळक रोड,लालबहादूर शास्त्री रोड,डेक्कन, आप्पा बळवंत चौक या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेसकडून फ्लेक्स बाजी करण्यात आलेली आहे
तसेच भारत जोडो यात्रेमध्ये 19 तारखेला पुण्यातून हजारो कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात शेगाव येथे होणाऱ्या राहुल गांधी यांच्या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत तसेच राहुल गांधी यांच्याकडून सध्या देश जोडण्याचं काम सुरू आहे आणि या कामामध्ये प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे असे मत मोनिका खलाणे यांनी व्यक्त केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.