तबस्सुम यांच्या निधनानंतर मुलानं सांगितलं नेमकं काय झालं...!!
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री व निवेदिका तबस्सुम गोविल यांचं शुक्रवारी निधन झालं. हृदयविकाराचा तीव्र झटका आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
तबस्सुम यांचा मुलगा होशांग गोविल याने इंडियन एक्स्पे्रसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, शुक्रवारी संध्याकाळी आईनं अखेरचा श्वास घेतला. आई अगदी ठणठणीत होती. 10 दिवसांपूर्वीच आम्ही आमच्या शोसाठी शूटींगही केलं होतं. पुढच्या आठवड्यात पुन्हा शूट होणार होतं. तिला गॅस्ट्रोची समस्या होती. त्यामुळे एका रूग्णालयात तिला भरती करण्यात आलं होतं. त्या रूग्णालयातून तिला डिस्चार्ज मिळाला होता. पण शुक्रवारी दोन मिनिटाच्या आत तिला दोनदा हृदयविकाराचा झटका आला आणि ती आम्हाला सोडून गेली.
गेल्यावर्षी तब्बसुम यांना कोरोना झाला होता. त्या 10 दिवस रूग्णालयात भरती होत्या. तब्बसुम यांना अल्झाइमर झाल्याचा अफवा मध्यंतरी पसरल्या होत्या.तबस्सुम यांनी 1944मध्ये बाल कलाकार म्हणून आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात केली होती. त्यावेळी त्या बेबी तबस्सुम नावानं ओळखायल्या जायच्या. तबस्सुम यांच्या खुमासदार निवेदनामुळे 'फूल खिले है गुलशन गुलशन' हा कार्यक्रम खूपच लोकप्रिय झाला होता. हा कार्यक्रम दूरदर्शवरून प्रसारित व्हायचा. तबस्सुम यांनी अनेक सिनेमांत आणि मालिकांमध्ये काम केलं होतं. तबस्सुम यांनी सिनेमा आणि मालिकांमध्ये तर काम केलंच. याशिवाय त्यांनी स्वत:चं युट्यूब चॅनेलही सुरू केलं होतं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.