मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 6 जणींची सुटका..
मुंबई : दक्षिण मुंबईत एका मोठ्या सेक्स रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एका घरामधील गुप्त खोलीतून २६ तरुणींची पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी तीन महिलांसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील एका घराच्या गुप्त खोल्यांमध्ये या तरुणींना ठेवण्यात आले होते. मुंबई पोलिसांची समाज सेवा शाखेने टीप मिळाल्यानुसार मंगळवारी लेमिंग्टन रोडवरील एका इमारतीमध्ये बनावट ग्राहक पाठविला. यानंतर माहिती मिळताच पोलिसांनी तिथे छापा मारला.
जे चार जण ताब्यात घेण्यात आले आहेत, ते हे सेक्स रॅकेट चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, त्यांचे १० साथीदार पळून गेले. देहव्यापारात अडकलेल्या या तरुणी वेगवेगळ्या राज्यांमधील आहेत. त्यांना जबरदस्तीने देहविक्रय करण्यास भाग पाडण्यात आले होते. ताब्यात घेतलेल्या सर्वांना डीबी मार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.