भाजप आमदाराचा मोठा गौप्यस्फोट..
जळगाव : काही दिवसांपूर्वीच जिल्हा दूध संघाची निवडणूक झाली. या निवडणुकीत एकनाथ खडसे गटाचा पराभव झाला, तर गुलाबराव पाटील आणि गिरीश महाज यांच्या गटाने बाजी मारली. यावरून अजूनही आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. खडसे यांच्या पराभवानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी या निवडणुकीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांकडून एकनाथ खडसे यांच्या पराभावासाठी प्रयत्न करण्यात आल्याचं मंगेश चव्हाण यांनी अप्रत्यक्षरित्या म्हटले आहे.
नेमकं काय म्हटलं मंगेश चव्हाण यांनी?
मंगेश चव्हाण यांनी जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. निवडणुकीपूर्वी मला अनेक राष्ट्रवादीच्या लोकांचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की कोणाला सांगू नका, खडसे राष्ट्रवादीत आल्याने आमचा ताण वाढला आहे. खडसे यांचा पराभव करा असं मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांचं नाव न घेता म्हटलं आहे.
ते ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी कुन्हा गावाता आले असताना बोलत होते. ईडीवरून टोला दरम्यान ईडी कारवाईवरून देखील मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांना टोला लगावला आहे. चुकीच्या मार्गाने पैसे कमावल्यास ईडी मागे लागते. ज्यांच्या मागे ईडी लागली त्याचं काय झालं हे सर्वांनी पाहिलं आहे, असं मगेश चव्हाण यांनी म्हटलं आहे. आता मंगश चव्हाण यांच्या टीकेला एकनाथ खडसे काय प्रत्युत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.