Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वेळू येथील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा

वेळू येथील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा


सातारा : पुणे - सातारा महामार्गावरील वेळू येथील श्रीराम पेट्रोल पंपावर दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी सशस्त्र दरोडा टाकला. त्यावेळी पेट्रोल पंपावर असलेल्या कामगारांसह एका सुरक्षा रक्षकाला दरोडेखोरांनी कोयत्याने मारहाण केली. त्याचबरोबर कामगाराकडील 21 हजार 800 रुपये लंपास दरोडेखोरांनी लंपास केले.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटिव्हीची पाहणी केली. त्यामध्ये दरोडेखोर स्पष्ट दिसत असल्यामुळे पोलिसांची तीन पथकं पुण्याकडे रवाना झाली आहेत. पुणे सातारा रस्त्यावरील वेळू गावाच्या हद्दीत असणाऱ्या तुषार जगताप यांच्या मालकीच्या श्रीराम पेट्रोल पंपावर रात्री साडे अकराच्या दरम्यान पाच जणांनी सशस्त्र दरोडा टाकून 21 हजार रुपये लुटले. त्यानंतर तीन कामगारांसह एका सुरक्षा रक्षकाला कोयत्याने मारहाण करून दरोडेखोरांनी पोबारा केला. खेडशिवापूरच्या राजगड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.