Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली शहर जिल्हा भाजपा कडून स्वर्गीय हिराबेन मोदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

 सांगली शहर जिल्हा भाजपा कडून स्वर्गीय हिराबेन मोदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.. 

हिराबेन - महान पुत्राची महान माता.... मकरंद देशपांडे 


शुक्रवार ३० डिसेंबर २०२२ : भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे आज निधन झाले.  त्यांना आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आमदार सुधीरदादा गाडगीळ, शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, प्रदेश कार्यकारणी सदस्य शेखर इनामदार, यांच्या उपस्थित स्वर्गीय हिराबेन मोदी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. हिराबेन मोदींच्या निधनामुळे देश एका आदर्श मातेला मुकला आहे. अतिशय गरिबीच्या खडतर परिस्थिती मध्ये त्यांनी आपल्या मुलांचे पालनपोषण केले. त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. त्यामुळे हिराबेन यांनी देशालाच नव्हे तर जगाला एक अनमोल हिरा नरेंद्रजींच्या रूपाने दिला आहे. मातोश्रींच्या अंत्यसंस्कारानंतर मोदिजी यांनी आपले नियोजित कार्यक्रम करण्यास सुरुवात करून एक आदर्श आपणासमोर ठेवला आहे.  हिराबेन मोदी यांच्याबद्दल हा देश सदैव कृतज्ञ राहील. अशी भावना भाजपचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मकरंद देशपांडे यांनी व्यक्त केली. आमदार सुधीर दादा  गाडगीळ  यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या श्रद्धांजली सभेत ते बोलत होते.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मकरंद देशपांडे शहर जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे, प्रदेश कार्यकारणी सदस्य शेखर इनामदार, संघटन सरचिटणीस दीपक माने,  महिला मोर्चा अध्यक्ष स्वाती शिंदे, ज्येष्ठ नेते प्रकाशतात्या बिरजे, गटनेत्या भारतीताई दिघडे, माजी महापौर संगीताताई खोत, उपमहापौर गीता सुतार, नगरसेवक  युवराज बावडेकर, पांडुरंग कोरे, सुब्राव मद्रासी, आनंद देवमाने, नगरसेविका  उर्मिला बेलवलकर, अनारकली कुरणे, सविता मदने, अल्पसंख्याक प्रदेश सचिव अश्रफ वांकर, माधुरी वसगडेकर,  हेमलता मोरे, प्रीती मोरे,  स्मिता पवार, ज्योती कांबळे, केदार खाडिलकर, मोहन वाटवे, भालचंद्र साठे, उदय मुळे, गौस पठाण, दीपक कर्वे, दरीबा बंडगर, रविंद्र सदामते, अमर पडळकर, गणपती साळुंखे, विनोद पाटील, ओमकार शुक्ल, शुभम कुलकर्णी, सुमित ठाणेदार, अजिंक्य कुलकर्णी, आबासाहेब जाधव आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते...


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.