महापालिकेतील कार्यालयावरून ठाकरे-शिंदे गटात राडा
मुंबई महापालिकेतील शिवसेनेचं कार्यालय शिंदे गटानं बुधवारी ताब्यात घेतंल. यामुळं ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पहायला मिळाले. यामुळे दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाचे नेते, कार्येकर्ते यांना वेळीच बाहेर काढल्याने अनुचित प्रकार टळला. यावेळी जोरदार घोषणाबाजाही करण्यात आली. यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. " 50 खोके एकदम ओक्के", " आव्वाज कुणाचा? शिवसेनेचा", "उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है" अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे म्हणाले, "शिवसेनेचं कार्यालय हे बाळासाहेबांच्या शिवसेनचं कार्यालयं आहे. मुंबई महापालिकेवर हक्क बाळासाहेबांच्या शिवसेनेचा अधिकार आहे. मुंबई बाळासाहेबांच्या शिवसेनेची असून त्यांच्या संकल्पेननंच आम्ही काम करतोय. कित्येक वर्षे आम्ही या कार्यालयातून काम केलं आहे. त्यामुळं याचं महत्व आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले, "घटनाबाह्य सरकार त्यानंतर बेकायदेशीर वागणं या सगळ्याचा महाराष्ट्राच्या जनतेनं गंभीर दखलं घेतली पाहिजे कारण यावर सरकार काही कारवाई करेल असं वाटत नाही. कारण यांना सगळ्याचं गोष्टी बेकायदा पाहिजे आहेत. कुठेही घुसायचं काहीही करायचं. असे शिंदे गटाचे लोक करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.