उर्फी जावेदने चित्रा वाघ यांना दिले आव्हान
अभिनेत्री उर्फी जावेद व भाजपच्या महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांच्यातील वाद थांबताना दिसत नाहीए. चित्रा वाघ यांनी उर्फी विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करून तिला तत्काळ अटक करण्याची मागणी केली होती. त्यानंतर उर्फीने ट्विटरवरून त्यांना फटाकरत त्यांना त्यांची संपत्ती जाहीर करण्यास सांगितली होती. या खडाजंगीच्या एका दिवसानंतरच उर्फीने पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचले असून त्यांना एक आव्हान दिले आहे.
दिल्लीतील कंझावाला अपघातातील तरुणीच्या आईचा व्हिडीओ शेअर करत उर्फी जावेदने चित्रा वाघ यांना टोला लगावला आहे. 'दिल्लीतील कंझावाल प्रकरणी पोलिसांनी निव्वळ अपघाताची नोंद केली आहे. ते तिला 12 किलोमीटरपर्यंत फरफटत घेऊन गेले. तिची हाडं तुटली. तिचे कपडे फाटून ती विवस्त्र झाली. सौ. चित्रा वाघ या प्रकरणातील एक आरोपी तुमच्या पक्षातील आहे. मला आता तुम्हाला त्याबाबत आवाज उठवताना पाहायला आवडेल', असे आव्हाने उर्फीने चित्रा वाघ यांना दिले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.