🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पत्नी माहेरी गेल्याने जावयाने केली सासूची हत्या

पत्नी माहेरी गेल्याने जावयाने केली सासूची हत्या


सासू पत्नीला घटस्फोट घेण्यासाठी उकसावत असल्याचा राग मनात धरून एका जावयाने त्याच्या सासूची निर्घृणपणे हत्या केली आहे. आंध्र प्रदेशमधील विजयवाडा शहरात ही घटना घडली आहे. राजेश असे त्या व्यक्तीचे नाव असून त्याने त्याची सासू नागमनी हिची भररस्त्यात सुरा खूपसून हत्या केली. हत्या केल्यापासून राजेश फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

राजेश व त्याची पत्नी सेल्वाराणी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. त्यामुळे सेल्वाराणी माहेरी राहत होती. तिची आई तिला राजेश विरोधात भडकवत होती असे त्याला वाटत होते. त्यामुळे त्याचा सासूवर रागत होता. ती सेल्वाराणीवर घटस्फोटासाठी अर्ज करण्यासाठी मागे लागली होती. त्यामुळे राजेशने रागाच्या भरात नारळ कापायच्या सुऱ्याने तिची हत्या केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.