🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शाकाहारी मटणचा भाव 1500 किलो !

शाकाहारी मटणचा भाव 1500 किलो !


उत्तर प्रदेशातील पिलीभीतच्या वनक्षेत्रात उपलब्ध होणारी कटरुआ ही रानभाजी मटणापेक्षा दुप्पट-तिप्पट दरात विकली जात आहे. सध्या या भाजीवर बंदी आहे. साल नावाच्या एका झाडाच्या मुळांमध्ये ही भाजी उगवते, हे विशेष!

ही भाजी जमीन खोदून काढावी लागते. वनक्षेत्रालगत राहाणारे ग्रामस्थ हे काम करतात. पिलीभीत वनक्षेत्राला 2014 पासून टायगर रिझर्व्हचा दर्जा देण्यात आलेला असल्याने या वनक्षेत्रातून कटरुआ मिळविणे बेकायदा आहे. वन्य जीवन गुन्हे नियंत्रण शाखेची नजरही असतेच. शहरातील स्टेशन चौकात काही लोक कटरुआ विकत होते. पंधराशे रुपये किलो भाव होता… आणि अचानक पोलिसांचा छापा पडला. विक्रेते पळून गेले, पण पोलिसांनी 50 किलो कटरुआ जप्त केला.

कटरुआची भाजी बनविण्याची पद्धत मटण बनविण्याच्या पद्धतीसारखीच असते. चवीला ही भाजी मटणासारखी लागते. या भाजीत प्रोटीनसह अनेक पोषक तत्त्वे असतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.