🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उमदीत 98 किलो गांजा जप्त : तिघांना अटक, दोघे पसार उमदी पोलिसांची कारवाई

उमदीत 98 किलो गांजा जप्त : तिघांना अटक, दोघे पसारउमदी पोलिसांची कारवाई


सांगली :  जत तालुक्यातील उमदी येथे आंध्रप्रदेश येथून गांजाची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ९८ किलो गांजा, एक मारूती स्विफ्ट कार असा 67 लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर गांजा पुरवठा करणारे आंध्रपदेश येथील दोघांचा पोलिस शोध घेत आहे. उमदी पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशीरा अमोघसिद्ध मंदीराकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही कारवाई केली.

इफ्तेखारूल हुसेन ऊफर् अरबाज बाबासाहेब शेख (वय 26, रा. जुना कुपवाड रोड, सांगली), प्रतीक हरिदास कांबळे (वय 26, रा. नागराळे, ता. पलूस), मोहसीन मेहबूब कागजी (वय 28, रा. शंभर फुटी रोड, सांगली) अटक केलेल्यांची नावे आहेत. तर आंध्रप्रदेश येथील प्रकाश भाई (पूणर् नाव नाही), पिंटू माळी (रा. सांगली) या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी अंमली पदार्थ उत्पादन, विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जत तालुक्यातील उमदी येथे कारमधून गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती उमदीचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांना खबऱ्याकडून मिळाली.

त्यानंतर सहायक निरीक्षक शिंदे यांनी उमदी ते अमोदसिद्ध रोडवर सापळा लावला होता. त्यावेळी माहितीप्रमाणे मारूती स्विफ्ट कार (क्र. एमएच 13 एझेड 1379) अडवली. गाडीची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये तब्बल 98 किलो गांजा सापडला. त्यानंतर तिघांना अटक करण्यात आली. यातील मुख्य सूत्रधार असलेल्या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.  उमदीचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लक्ष्मण खरात, शिरीष शिंदे, नामदेव काळेल, प्रशांत कोळी, आप्पासाहेब हाके, नितीन पलूसकर, महादेव मडसनाळ, मनीष कुमरे, इंद्रजित गोदे, सोमनाथ पोटभरे, अमोल पाटील, सोपान भंडे, वहिदा मुजावर, समीक्षा म्हेत्रा आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.