जगविख्यात मराठमोळा बॉडीबिल्डर आशिष साखरकरचं निधन
जगविख्यात मराठमोळा बॉडीबिल्डर आशिष साखरकर याचं निधन झालं आहे. आशिषनं देश-विदेशात अनेक स्पर्धा जिंकत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला होता. मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स, महाराष्ट्र श्री यांसारखे अनेक खिताब आशिषनं आपल्या नावे केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आशिष आजाराशी झुंज देत होता. अखेर या आजारानंच आशिषचं निधन झालं. आशिष साखरकर म्हणजे, बॉडीबिल्डिंग जगतातलं एक मोठं नाव. आज आशिषच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
