Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खासगी कंपनीत एमडी अन् सीईओचा निर्घृण खून

खासगी कंपनीत एमडी अन् सीईओचा निर्घृण खून


बंगळूरु येथील अमृताहल्ली येथील एरोनिक्स मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या टेक कंपनीमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. एका माजी कर्मचाऱ्याने कंपनीचे एमडी आणि सीईओची हत्या केल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी चार वाजता कंपनीचा माजी कर्मचारी फेलिक्स कार्यालयात दाखल झाला. 

त्याने कंपनीचे एमडी पी. सुब्रह्मण्य आणि सीईओ वीनू कुमार यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर तो तिथून फरार झाला. एमडी आणि सीईओ यांना कंपनीतील लोक रुग्णालयात नेत होतं परंतु रस्त्यामध्येच दोन्ही अधिकाऱ्यांनी जीव सोडला. आरोपी फेलिक्स हा फरार आहे. आम्ही लवकरच आरोपींना ताब्यात घेऊ, असं पोलिस सांगत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.