🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महिला पोलिसावर अत्याचार करणारा पोलिस निलंबित

महिला पोलिसावर अत्याचार करणारा पोलिस निलंबित



सांगली :  महिला पोलिसाला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या पोलिसास अखेर निलंबित करण्यात आले. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी हे आदेश दिले आहेत. पोलिस बँड पथकातील वसीम शब्बीर ऐनापुरे (वय ३५, संजयनगर) असे त्याचे नाव आहे. तो सध्या पोलिस कोठडीत आहे. संशयित वसीम याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून ४ मार्चपासून ६ जुलैपर्यंत विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार इच्छेविरुद्ध अत्याचार केला. यामध्ये पीडिता गर्भवती राहिली. 

पीडिता गर्भवती असल्याचे समजल्यानंतर संशयित वसीम याने तिला गर्भपात करण्यासाठी जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्याही खायला घातल्या. याबाबत पीडितेने तक्रार करू नये यासाठी वसीम याच्या वडिलांनी पीडितेच्या भावाला फोनवरून धमकी दिली. त्यानंतर संशयित वसीम यास अटक करण्यात आली आहे. आज त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.