🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत घरफोड्यास अटक दोन गुन्हे उघडसांगली एलसीबीची कारवाई

सांगलीत घरफोड्यास अटक  दोन गुन्हे उघडसांगली एलसीबीची कारवाई


सांगली : सांगलीत चोरीचे मोबाईल विक्रीसाठी आलेल्या घरफोड्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून तासगावमधील दोन गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. 

तुषार सुरेश टकले (वय ३०, रा. गीतानगर, कवलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस अधीक्षक डॅ. बसवराज तेली यांनी चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार निरीक्षक श्री. शिंदे यांनी खास पथक तयार केले होते. पथकाला कवलापूर येथील एक तरूण चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी सांगलीत येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. 

पथकाने कुमठे फाटा येथे सापळा रचून त्या तरूणाला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे दोन मोबाईल सापडले. त्याबाबत पथकाने त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर तासगाव येथील पागा गल्ली येथील दोन घरे फोडून तेथून ते मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्याला तासगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मागर्दशर्नाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, उदयसिंह मच्छिंद्र बडेर्, उदय माळी, विक्रम खोत, अमर नरळे, संदीप गुरव, सागर लवटे, बिरोबा नरळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.