कुपवाडमधील वैभव आवळे टोळी दोन वषार्साठी हद्दपारपोलिस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांची कारवाई
सांगली: धारदार शस्त्राने हल्ला करणे, दरोडा टाकणे, कट रचून खुनाचा प्रयत्न, घरफोडी करणाऱ्या कुपवाड एमआयडीसीतील वैभव आवळे टोळीला दोन वषार्साठी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक डॅ. बसवराज तेली यांनी या टोळीच्या हद्दपारीचे आदेश दिले आहेत. वैभव राजाराम आवळे (वय २५, रा. हडको कॅलनी, मिरज), सागर निवास धनवडे (वय २३, रा. दबडे चाळ, मिरज), समथर् ऊफर् श्री विश्वास गवळी (वय २१, रा. सुभाषनगर, मिरज) अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत.
या टोळीवर खुनाचा प्रयत्न, दरोडा, घरफोडी, वाहने पेटवणे, शिवीगाळ, दमदाटी करत दुखापत करणे असे अनेक गंभीर गुन्हे २०१९ ते २०२३ या कालावधीत दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून नागरिकांना तसेच मालमत्तांना धोका असल्याने कुपवाड पोलिसांनी या टोळीला हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक डॅ. तेली यांच्याकडे सादर केला होता. त्या प्रस्तावाचे तसेच चौकशी अधिकाऱ्यांच्या अहवालाचे अवलोकन केल्यानंतर अधीक्षक डॅ. तेली यांनी या टोळीला सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, कुपवाडचे सहायक निरीक्षक अविनाश पाटील, सिद्धाप्पा रूपनर, दीपक गट्टे, राजेंद्र नलवडे, सतीश माने यांनी या कारवाईत भाग घेतला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.