छोटय़ा बहिणीसमोर मोठय़ा बहिणीवर सामूहिक बलात्कार, भाजप नेत्याच्या मुलाला अटक
मध्य प्रदेशात एका 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. छोटय़ा बहिणीसमोर मोठय़ा बहिणीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर या नराधमांनी अल्पवयीन मुलीला मारहाणही केली. मध्य प्रदेशातील दातिया जिह्यात ही घटना घडली असून मध्य प्रदेशचे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांचा हा मतदारसंघ आहे. गृह मंत्र्यांच्या मतदारसंघात महिलेवर दिवसाढवळ्या गँगरेप झाल्याने मध्य प्रदेशात महिला सुरक्षित नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.
दुपारी शाळेतून दोन्ही बहिणी घरी येत होत्या. या वेळी आरोपींनी त्यांना बळजबरीने कारमध्ये बसवले. आरोपी रामकिशोर यादव याच्या घरी घेऊन गेले. या ठिकाणी चौघांनी मोठय़ा मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर तिच्या बहिणीचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी भाजप नेत्याच्या मुलासह दोन आरोपींना अटक केली आहे. अन्य दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. घटनेनंतर यातील पीडित मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्यावर झाशीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात मुख्य आरोपी हा भाजप नेते किशन राय यांचा मुलगा ध्रुव राय असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, भाजप नेत्याने आपल्या मुलावरील आरोप फेटाळले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
