Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल वाजणार; निवडणूक आयोगाचे मोठे संकेत

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल वाजणार; निवडणूक आयोगाचे मोठे संकेत 


मागील अडीच वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुका  सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये  होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने  राजपत्र जारी केले आहे. हे राजपत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदार याद्या  तयार करण्याबाबत आहे. सप्टेंबर 2023 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत निवडणुका होणार असल्याचे राजपत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय  होण्याची शक्यता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना 

सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाचा निकाल रखडला आहे. हा निकाल या दरम्यान लागून लगेच निवडणुका लागतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु हा निकाल लागला नाही तर सरकार ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याची शक्यता अधिक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मुंबई-पुण्यासह राज्यातील 11 पालिकांची मुदत मागील वर्षी 15 मार्चला संपली. पाच महापालिकांची मुदत संपून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. 

मतदार यादीसाठी आयोगाने आदेश जारी केले आहे. आयोगाने मतदार याद्या या 1 जुलै 2023 पर्यंत अस्तित्वात असलेल्या निवडणुकीसाठी वापरण्यात येतील, असे सूचित केले आहे. याबाबतचा अध्यादेश काढला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सप्टेंबर 2023 ते ऑक्टोर 2023 या कालावधीत होणार आहेत, असे आयोगाने म्हटले.

'या' महापालिकेच्या निवडणुका होणार -

बृहन्मुंबई 
नवी मुंबई 
पनवेल 
पिंपरी चिंचवड 
पुणे 
ठाणे 
उल्हासनगर 
वसई-विरार 
अहमदनगर 
अमरावती 

छत्रपती संभाजी नगर
भिवंडी-निजामपूर 
चंद्रपूर 
जळगाव 
कल्याण डोंबिवली 
कोल्हापूर 
मीरा भाईंदर 
नागपूर 
नांदेड-वाघाळा 
नाशिक 
सांगली मिरज आणि कुपवाड शहर 
सोलापूर

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.