🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गुंड सचिन टारझन याच्यावर खुनी हल्ला; प्रकृती चिंताजनक अहिल्यानगर येथील घटना.

गुंड सचिन टारझन याच्यावर खुनी हल्ला ;  प्रकृती चिंताजनक  अहिल्यानगर येथील घटना.


पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार, नामचीन गुंड सचिन ऊर्फ सच्या टारझन याच्यावर सोमवारी सकाळी धारदार शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आला. अहिल्यानगर येथे ही घटना घडली. दरम्यान गंभीर जखमी अवस्थेत त्याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सच्या टारझन पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. एका खुनाच्या गुन्ह्यात तो सध्या जामिनावर बाहेर आहे. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास काही अज्ञात तरुण त्याच्या घरात घुसले. त्या तरुणांनी सच्यावर धारदार हत्याराने हल्ला चढवला. काही मिनिटातच हल्ला करून ते पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेत सच्या टारझन याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता नालसाब मुल्ला याचा काही दिवसांपूर्वी खून झाला होता. त्यात सचिन टारझनचा सहभाग होता अशी चर्चा होती. पण पोलिस तपासात तसे निष्पन्न झाले नाही. सच्या टारझनवर खुनी हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. कुपवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. दरम्यान सच्या टारझनवरील हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.