शेजारणीचा टोमणा जिव्हारी लागला; हातोड्याने केली तिघांची हत्या
दिल्ली : पंजाबच्या लुधियानातील सालेम ताबरी येथील न्यू जनकपुरी भागात एकाच घरातील तिघांचे मृतदेह आढळले होते. ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी १२ तासांत या प्रकरणाची उकल करून आरोपीला अटक केली. या तपासात शेजाऱ्यानेच ही हत्या केल्याचे स्पष्ट झाले असून त्याचे हादरवून टाकणारे कारण समोर आले आहे. ही हत्या या कुटूंबाच्या शेजारीच राहणाऱ्या रॉबीन नावाच्या ऑटो चालकाने केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला मूल नसल्याने शेजारी राहणारी स्त्री त्याला टोमणे मारत असे. त्यामुळेच रॉबिनने हत्या केल्याची कबुली दिली.
रॉबिन पठाणकोटचा रहिवासी असून तो ऑट चालवतो. त्याचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते, मात्र त्यांना मूलबाळ नव्हते. याच कारणावरुन त्याच्या शेजारी राहणारी सुरिंदर कौर त्याला टोमणे मारायची तुम्हाला मूल का होत नाही? डॉक्टरांकडून तुझ तपासणी करुन घे? असे सल्ले ती द्यायची. याच रागातून त्याने सुरिंदरचा काटा काढण्याचे ठरवले.
घटनेच्या दिवशी सुरिंदर कौर काही कामानिमित्त टेरेसवर गेल्या होत्या. आरोपी शेजारील टेरेसवरच मोबाईल पाहत होता. त्यावेळीही सुरिंदर कौर पुन्हा मुलाबद्दल बोलल्या आणि नंतर खाली गेल्या. यानंतर आरोपी हातोडा घेवून त्यांच्या घरात घुसला सुरिंदर कौर यांच्यावर हल्ला केला. यानंतर त्याने चमन लाल व त्याची पत्नी आणि आई सुरिंदर कौर यांचीही आरोपीने हत्या केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
